PM Modi Kalaram Mandir : शंखनाद..अन्‌ श्रीरामाचा जयघोष..! अशी झाली मोदींची रामतीर्थावर पूजाविधी, नाशिककर ठरले साक्षीदार

पंचवटीतील रामतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजनासाठी येणार म्‍हटल्‍यावर या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककर गोदाकाठी उपस्‍थित होते.
PM Modi Kalaram Mandir
PM Modi Kalaram Mandiresakal
Updated on

नाशिक : पंचवटीतील रामतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजनासाठी येणार म्‍हटल्‍यावर या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककर गोदाकाठी उपस्‍थित होते. परिसरातील य. म. पटांगणापासून पुढील भागात गोदाघाटावर नाशिककरांनी ठाण मांडले होते.

एकीकडे पंतप्रधान मोदींकडून पूजाविधी पार पडत असतांना, उपस्‍थित भाविकांकडून शंखनाद केला. यासोबत 'जय श्रीराम'चा जयघोष करण्यात आला. (Nashikkar witnessed pm Modi worship at goda ghat nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या कार्यक्रमामुळे रामतीर्थ परीसराची सुरक्षा वाढविण्यात आली होती. त्‍यामुळे श्री नीलकंठेश्‍वर मंदिरापासून पुढील भागात नाशिककरांनी गोदातीरावर ठाण मांडला होता. तसेच नदीकाठी असलेल्‍या इमारतींच्‍या खिडक्‍या, गच्चीवर उपस्‍थित राहून नाशिककर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार झाले.

मंत्रोच्चारण आणि ध्वनिवर्धकावरून उद्‌घोषणा होत असताना उपस्‍थित नागरिकांनीही आपला सहभाग नोंदविला. एका भाविकाने शंखनाद करत वातावरणात ऊर्जा निर्माण केली. यासोबत उपस्‍थित नागरिकांनी जय श्रीरामचा जयघोष करतांना मोदींच्‍या समर्थनार्थ घोषणा दिल्‍या.

धार्मिक विधी पटांगणावर

ऐरवी रामतीर्थ परीसरात होणारे धार्मिक विधी शुक्रवारी होऊ शकले नाही. हे विधी य. म. पटांगणापासून पुढील भागात गौरी पटांगणापर्यंतच्‍या परीसरात पार पडले. रोजच्‍या तुलनेत धार्मिक विधींची संख्या मात्र कमी राहिली.

नाशिककर ठरले मोदींच्‍या पूजाविधीचे साक्षीदार
नाशिककर ठरले मोदींच्‍या पूजाविधीचे साक्षीदारesakal
PM Modi Kalaram Mandir
PM Modi Nashik Visit : राजकीय क्षेत्रातून मोदींच्‍या उमेदवारीचे स्‍वागत; विकासाची गती वाढणार असल्‍याचा विश्‍वास

पंचवटीच्‍या गल्‍लीबोळात शुकशुकाट

ऐरवी मोठी वर्दळ राहाणार्या पंचवटी भागात पोलिस बंदोबस्‍तामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत शुकशुकाट राहिला. रामतीर्थाकडे येणार्या सर्व रस्‍त्‍यांवर साधारणतः ३०० ते ४०० मीटर अलीकडेपर्यंत प्रवेश बंदी केलेली होती. तसेच परीसरातील दुकान बंद ठेवले होते.

शहरभरात कट-आउटने वातावरण निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दौर्यानिमित्त शहर परीसरातील प्रमुख ठिकाणी नेते मंडळीचे कट-आउट झळकले. रविवार कारंजा सर्कल येथे पंतप्रधान मोदींसह शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्‍यासह भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींचे कटआउट होते. त्‍याप्रमाणे द्वारका सर्कल भागातही नेते मंडळीचे कट-आउट लावलेले होते.

PM Modi Kalaram Mandir
PM Modi Nashik Visit : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज! जाहीर सभा, ‘रोड शो’सह घेणार श्री काळाराम दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com