Nashik Drug Case: नाशिकच्या ड्रग्जमाफियांचा सोलापुरात कारखाना; नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई

Nashiks drug mafia factory in Solapur Major action by Nashik Police
Nashiks drug mafia factory in Solapur Major action by Nashik Policeesakal
Updated on

Nashik Drug Case : गेल्या सप्टेंबर महिन्यातील एमडी ड्रग्जसप्रकरणी दाखल गुन्ह्यांची पाळेमुळे खणूण काढताना नाशिक पोलीस सोलापूरतील मोहोळपर्यंत पोहोचले.

याठिकाणी बंद असलेल्या केमिकल कंपनीत नाशिकच्या ड्रग्जमाफियांकडून एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याचे निष्पन्न झाले असून, नाशिक शहर गुन्हेशाखेने कारवाई करीत या कारखान्यातून सव्वा तीन कोटींची ६ किलो ६०० ग्रॅम एमडी व सुमारे ३ कोटींचा १४ किलो कच्चा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी मुख्य सूत्रधार सनी पगारे याच्यासह आठ संशयित अटक असून, पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या रॅकेटच्या धागेदोर्यांचा शोध पोलिस घेत आहेत. (Nashiks drug mafia factory in Solapur Major action by Nashik Police Drug Case Crime)

esakal
esakal

नाशिक शहर गुन्हेशाखेच्या तीन पथकांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील खासगी औद्योगिक वसाहतीतील या श्री स्वामी केमिकल कंपनीवर कारवाई केल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ उपस्थित होते.

सामनगाव येथे नाशिकरोड पोलिसांनी १२.५ ग्रॅम एमडी ड्रग्जस्‌सह संशयित गणेश संजय शर्मा यास ७ सप्टेंबर २०२३ रोजी अटक करीत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यात गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गोविंद संजय साबळे, आतिष उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी याना अटक केली होती. शर्मा याने या दोघांकडून एमडी खरेदी केली होती.

याच रॅकेटचा तपास करीत असताना पोलिसांच्या हाती नाशिकमध्‌ये एमडी ड्रग्जची विक्री करणारा मुख्य संशयित सनी अरुण पगारे (३१), त्याचा भाऊ  सुमीत अरुण पगारे (दोघे रा. गोसावीवाडी, नाशिकरोड), अर्जून सुरेश पिवाल, मनोज भारत गांगुर्डे यांना अटक करीत त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती.

संशयितांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हेशाखेने मोहोळ (जि. सोलापूर) येथे कारवाई करीत एमडीचा कारखाना उदध्वस्त केला. यापूर्वी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनीही सोलापूरात एमडीचा कारखाना उदध्वस्त केला आहे.

याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आत्तापर्यंत आठ संशयितांना अटक केली असून, दोघा फरार संशयितांचा शोध घेत आहेत. तर, दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेेले आहे.  

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत फड, डॉ. धर्मराज बांगर, किरण रौंदळ, प्रवीण सूर्यवंशी, हेमंत तोडकर यांच्या पथकाने बजावली.

मोहोळमध्ये दीड वर्षांपासून एमडीचा उद्योग

नाशिकमध्ये एमडी ड्रग्जची सनी पगारे व अर्जून पिवाल हे विक्री करायचे. परंतु ते ड्रग्ज आणतात कोठून यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू होती.

याच तपासातून पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सनी पगारे याच्या घरातून एक कोटी ३ लाखांची २ किलो ६३ ग्रॅम तर, मनोज गांगुर्डे याच्या घरातून ५१ लाख ३५ हजारांची १ किलो २७ ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला.

या कारवाईमुळे सनी पगारे याने संशयित मनाेहर पांडुरंग काळे व सोलापूरातील स्थानिक चव्हाण यांच्या मदतीने मोहोळमध्ये (जि. सोलापूर) एमडी ड्रग्ज बनविण्याचा उद्योग सुरू केला होता.

दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी खासगी औद्योगिक वसाहतीतील बंद असलेली श्री स्वामी समर्थ केमिकल प्रा.लि. ही फिनाईल बनविण्याची कंपनी भाड्याने घेतली होती.

Nashiks drug mafia factory in Solapur Major action by Nashik Police
Nashik MD Drug Case : एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी महापौरांचा जबाब; अमलीपदार्थ विभागाकडून चौकशी

‘प्लांट’चा होता मनसुबा

कंपनी सुरू करण्यापूर्वी ते मोहोळमधील एका घरात एमडी ड्रग्ज बनवित होते. साधारण १० किलोपर्यंत एमडी ड्रग्ज तयार करायचे.

मागणी वाढल्याने त्यांनी कंपनी भाड्याने घेऊन त्याठिकाणी मोठा प्लांटच सुरू करण्यासाठी दोन-तीन महिन्यांपूर्वी श्री स्वामी समर्थ केमिकल कंपनी भाड्याने घेतली.

याठिकाणी लॅब उभारण्यात आली होती. याठिकाणाहून नाशिक गुन्हेशाखेने कारवाई करीत ३ कोटी ३० लाखांचा एमडीचा ६.६०० किलोचा साठा तर, २ कोटी ८४ लाख ८६ हजारांचा १४.२४३ किलो एमडीचा कच्चा माल जप्त केला आहे. सामनगाव गुन्ह्यात आत्तापर्यंत पोलिसांनी

"शहर गुन्हेशाखेच्या पथकांनी एमडी ड्रग्जप्रकरणी दाखल तीन गुन्ह्यांचा तपास करताना यातील एका गुन्ह्यात मोठी कारवाई केली. मोहोळ (जि.सोलापूर) येथील एमडीचा कारखाना शोधून कारवाई केली आहे. यात आणखीही काही महत्त्वाची माहिती तपासातून निष्पन्न होण्याची शक्यता आहे."- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त.

कारखान्यातून जप्त मुद्देमाल

० ६ किलो ६०० ग्रॅम एमडी पावडर : ३ कोटी ३० लाख रुपये

० १४ किलो २४३ ग्रॅम एमडी सदृष्यमाल : २ कोटी ८४ लाख ८६ हजार रुपये

० ३० किलो कच्चा माल : ६० लाख रुपये

० रासायनिक द्रव्ये : १० लाख रुपये

० साहित्य : २५ लाख रुपये

एकूण : ७ कोटी ९ लाख ८६ हजार रुपये

Nashiks drug mafia factory in Solapur Major action by Nashik Police
Nashik MD Drug Case: अमली पदार्थांविरोधात आता एकत्र लढा; पोलिस, अन्न औषध, उत्पादन शुल्क समन्वयाने काम करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.