राष्ट्रीय जलद, अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा २७ पासून

नाशिकमध्ये प्रथमच स्‍पर्धा होत असल्‍याची आयोजकांची माहिती
बुद्धिबळ
बुद्धिबळSakal
Updated on

नाशिक - जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्‍पर्धा आयोजित केली आहे. २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान या स्पर्धा नाशिकरोड येथील महाराष्ट्र एव्हायर्मेंट एंजिरींग ट्रेनिंग अँड रिसर्च ॲकॅडमी येथे होणार आहे. अशा स्वरूपाची स्‍पर्धा भरविण्याचा मान नाशिकला प्रथमच मिळाला असल्‍याचे आयोजकांनी कळविले आहे. राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ निवड स्पर्धेसाठी पाचशे ते साडे सातशे बुद्धिबळपटूंचा सहभाग अपेक्षित आहेत. खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था जिल्हा संघटना मोफत केली जाणार आहे. महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय टीमचे प्रशिक्षक प्रवीण ठिपसे, पदमश्री व महिला इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे, ग्रँडमास्टर दिव्या देशमुख या बुद्धिबळपटूंसह ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण, अरविंद चिदंबरम, निलोपतल दास, गोपाल नारायण, मित्रभ गुहा तसेच इंटरनॅशनल मास्टर प्रणव आनंद, फिडे मास्टर आराध्य गर्ग, निरंजन नवलगुडे आदींचा खेळ बघण्याची संधी यावेळी उपलब्‍ध असेल. त्‍यांच्‍यासोबत खेळण्याची संधीदेखील मिळणार आहे.

स्पर्धेत सहभाग पक्का केलेल्या दिव्या देशमुखने काही महिन्यापूर्वीच भुवनेश्वरला झालेली महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. अशा दर्जेदार खेळाडूंचा बुद्धिबळ डावांचा आनंद घेण्यासाठी भारतभरातील बुद्धिबळप्रेमी या बुद्धिबळ सोहळ्यानिमित्त स्पर्धेस भेट देतील. या राष्ट्रीय स्पर्धेत दहावी, बारावीला सहभागाचे १५ गुण व विजेत्‍यास २० गुण प्राप्त होतात. तसेच पुढील वाटचालीत ही राष्ट्रीय स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नाशिकच्‍या जास्‍तीत जास्‍त बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जयराम सोनवणे ९८६०१३६००२, भूषण पवार ७८४१९२४८४१, जयेश भंडारी ७८७५८८८८३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे केले आहे. यशस्वितेसाठी राजेंद्र सोनवणे, जयराम सोनवणे, विनायक वाडिले, विक्रम मावळंकर, गौरव देशपांडे, भूषण ठाकूर, अजिंक्य तरटे, मंगेश गंभिरे, सचिन निरंतर, माधव चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.

देशाचे प्रतिनिधीत्‍वाची संधी

राष्ट्रीय जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धेतून निवडलेले खेळाडू जागतिक जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

स्‍पर्धेचे थेट प्रक्षेपण, साडे सहा लाखांची बक्षिसे

स्‍पर्धेचे थेट प्रक्षेपण विविध डिजिटल माध्यमांतून केले जाईल. स्पर्धेत २८ ते २९ एप्रिलदरम्‍यान जलद बुद्धीबळ स्पर्धेचे एकूण ९ सामने खेळण्यात येणार आहेत. तर ३० एप्रिलला अतिजलद या बुद्धिबळाच्या प्रकारातील ११ डाव खेळवण्यात येतील. स्पर्धेत एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()