नाशिक : प्रत्येक शाळेमध्ये गायले जाणार 'राष्ट्रीय नदी गीत'

godavari
godavariesakal
Updated on

नाशिक : समाजाचे निसर्गाशी नाते पुनःश्च जोडले जावे, गोदावरी तथा सर्वच नद्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन सन्मानाचा व्हावा यासाठी 'राष्ट्रीय नदी गीत' (National River Anthem) हे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी म्हटले जाणार आहे. शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी तसे आदेश काढले असल्याची माहिती नमामि गोदा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित यांनी दिली.

राष्ट्रीय नदी गीत याबद्दल उपक्रमाबद्दल सांगताना ते म्हणाले की, यामध्ये अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी नदी म्हणजे काय ह्याची व्याख्या केली आहे, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंग यांनी नदीला गोदावरी अविरल निर्मल का असणे गरजेचे आणि ते कसे करावे हे सांगितलं आहे. गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी हे गीत गायले असून काजल शाह यांच्या टिम ने त्याचे कॉम्पोझीशन केले तर पोलिस ADG रवींद्र सिंगल, पोलिस सहआयुक्त मुंबई विश्वास नांगरे पाटील यांचे मोलाचे सहकार्य दिले. चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव यांनी त्यात भूमिका केली असून निषाद वाघ यांनी लेखन दिग्दर्शन केले आहे तर या गीताची निर्मीती राजेश पंडित आहे.

godavari
नाशिक विभागात २७८ हत्तीरोग रुग्ण; ३१ ऑगस्टपर्यंत दुरीकरण मोहीम

राष्ट्रिय नदी गीत हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांमधअये राबविण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांचा नद्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा आणि पुन्हा एकदा त्यांचे निसर्गाशी तुटलेले नाते जोडले जाण्यास मदत होणार आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने वर्ग सुरु होण्यापुर्वी हे गीत ऐकवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यानंतर प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थांना राष्ट्रीय नदी गीत याबद्दल माहिती देवून सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करुन घेण्याचे आदेश देण्यात आला आहे.

godavari
अमित ठाकरे आजपासून चार दिवस नाशिक दौऱ्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.