Nashik: Radio Vishwas 90.8 कम्युनिटीला राष्ट्रीय पुरस्कार; मंत्री अनुराग ठाकुरांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान

Central Director of Nashik's Radio Trust Dr. Hari Kulkarni and Coordinator Richita Thakur.
Central Director of Nashik's Radio Trust Dr. Hari Kulkarni and Coordinator Richita Thakur.esakal
Updated on

Nashik News : नवी दिल्ली येथील दोन दिवसीय प्रादेशिक रेडिओ संमेलनात नाशिकच्या रेडिओ विश्‍वास ९०.८ कम्युनिटी रेडिओला दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘सस्टेनॅब्लिटी’ श्रेणीत प्रथम, तर ‘थिमॅटीक’ श्रेणीत द्वितीय पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रेडिओ विश्‍वासचे केंद्र संचालक डॉ. हरी कुलकर्णी आणि समन्वयक ऋचिता ठाकूर यांनी स्वीकारला. (National Award to Radio Vishwas Community Honored in New Delhi by Minister Anurag Thakur nashik news)

राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार त्यांच्या क्षेत्रातील लोकहितासाठी कार्य करणाऱ्‍यांना दिला जातो. आठव्या आणि नवव्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कारासाठी ४ श्रेणींमध्ये १९ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र, हरियाना, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान आणि त्रिपुरा या राज्यातील पुरस्कार विजेते सामुदायिक रेडिओ स्टेशनचा त्यात समावेश आहे. रेडिओ विश्वासतर्फे कोरोना काळात केलेल्या ‘शिक्षण सर्वांसाठी’ या कार्यक्रमाचा विशेष उल्लेख श्री. ठाकूर यांनी केला.

सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रेडिओ विश्वास आणि प्रा. प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने तिसरी ते दहावीच्या सर्व विषयांवर जिल्ह्यातील दोनशे शिक्षकांनी संपूर्ण अभ्यासक्रम प्रसारित केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Central Director of Nashik's Radio Trust Dr. Hari Kulkarni and Coordinator Richita Thakur.
NMC School : महापालिकेच्या शाळांमध्ये 845 विद्यार्थ्यांची वाढ! झोपडपट्टी भागात जाऊन सर्वेक्षण

त्याचा जिल्ह्यातील पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला. इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन साडेपाचशे रेडिओ सेटचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले. विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रेडिओ विश्वासचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी अभिनंदन केले.

"लोकसहभागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआंदोलनाचे ‘व्हीजन’ साकार करण्यात कम्युनिटी रेडिओ स्टेशनची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रेडिओ स्टेशन्स ऑल इंडिया रेडिओची भूमिका आणि प्रयत्न पुढे नेतात आणि आपत्तीच्या वेळी त्यांच्या श्रोत्यांना माहिती देतात जनजागृती करतात."- अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री

Central Director of Nashik's Radio Trust Dr. Hari Kulkarni and Coordinator Richita Thakur.
Nashik News: खरिपाच्या राज्यात 84 टक्के पेरण्या; छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती विभाग आघाडीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.