National Fencing Competition : मुलांमध्ये विजेता अन् मुलींमध्ये महाराष्ट्रास उपविजेतेपद!

On honor of being present with the winners of the National Fencing Championships.
On honor of being present with the winners of the National Fencing Championships.esakal
Updated on

नाशिक : जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्यातर्फे सतराव्‍या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचा समारोप झाला. मुलांच्‍या गटात महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या गटात मणिपूरने विजेतेपद पटकावले आहे. या गटातून महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (National Fencing Competition maharashtra Winner in Boys and runner up in Girls Nashik News)

फेन्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभागाच्या सहकार्याने (स्व.) मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे कॅडेट गटाच्या १९ वर्षे मुलांची आणि मुलींची सतराव्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून मुलांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुलींच्‍या गटातून मणिपूरच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून ३८ गुणांसह विजेतेपद मिळविले. मुलांच्या सॅबर प्रकारात महाराष्ट्राच्या निखिल वाघने पहिल्या सामन्यापासूनच आक्रमक खेळ करून सुवर्णपदक पटकावले. तर श्रेयश जाधवने कास्यपदक मिळविले. या दोन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला मुलांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळविता आले. मुलींमध्ये फॉईल प्रकारात महाराष्ट्राच्या वैदेही लोहियाने अंतिम लढतीत मणिपूरच्या सोनिया देवी वैकहोमला चांगली लढत दिली.

परंतु शेवटच्या दोन मिनिटात सोनिया देवीने तीन गुण वसूल करून अंतिम सामना जिंकताना विजेतेपद मिळविले. त्यामुळे वैदेहीला रौप्‍यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या ईपी प्रकारात महाराष्ट्राच्या जान्हवी जाधवलाही अंतिम लढतीत मणिपूरच्या देवी सईकहोम नेलकीरोजने पराभूत केल्यामुळे तिलाही रौप्‍य पदक मिळाले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या अनुजा लाडने उपांत्य फेरी गाठून चांगली कामगिरी करत कांस्यपदक मिळविले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

On honor of being present with the winners of the National Fencing Championships.
Nandurbar News | ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे : मनीषा खत्री

मुलींच्या सॅबर प्रकारात उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या शर्वरी गोसावडेचा उपांत्य फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे तिलाही कास्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या मुलींच्या कामगिरीमुळे त्यांना सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मणिपूरच्या सोनिया देवी वैकहोम, देवी सईकहोम नेलकीरोज आणि लाईश्राम याबी देवी या तिन्‍ही खेळाडूंनी अनुक्रमे ईपी, फॉईल आणि सॅबर या तीनही प्रकारात वर्चस्व राखून सुवर्णपदक मिळविले.

त्यांच्या या कामगिरीमुळे मणिपूरला महिलांमध्ये सर्वसाधारण विजेतपद मिळाले. या स्पर्धेत विजयी संघांना आमदार ॲड.राहुल ढिकले, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित केले. याप्रसंगी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष शिवछत्रपती प्राप्त शेषनारायण लोढे, विलास वाघ, माजी पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत बनकर, प्राचार्य हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.

स्‍पर्धेचा निकाल असा-

मुले : सर्वसाधारण विजेते- महाराष्ट्र (१८ गुण). उपविजेते- हरियाना (१६ गुण), तिसरा क्रमांक- मणिपूर (१५ गुण).

मुली : सर्वसाधारण विजेते- मणिपूर (३८ गुण), उपविजेते- महाराष्ट्र (१६ गुण), तिसरा क्रमांक- हरियाना (१४ गुण).

On honor of being present with the winners of the National Fencing Championships.
Nashik News : आकडेमोडीत रमणारा अधिकारी पहिल्‍याच प्रयत्‍नात बनला Ironman

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.