National Level Conference: राष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. ईश्वर बाठे यांची निवड

Ishwar Bathe
Ishwar Batheesakal
Updated on

National Level Conference : राष्ट्रीय परिषदेसाठी देशातून सात भूगर्भ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग आयआयआरएस यांच्या संयुक्त विद्यमाने डेहराडून उत्तराखंड येथे राष्ट्रीय परिषद होणार आहे.

यात मेट भुजबळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. ईश्वर बाठे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या परिषदेसाठी निवड झालेले प्राध्यापक बाठे हे एकमेव आहेत. (National Level Conference Selection of Prof Ishwar Bathe nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ishwar Bathe
MUHS Post Graduate Result: आरोग्य विद्यापीठाचा पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा निकाल जाहीर

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६ ते २०२८ या दरम्यान होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आराखडे, परिस्थिती आणि वस्तुस्थितीवर ईश्वर बाठे सॅटेलाइटद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे व त्यावरील अभ्यासाचे सादरीकरण करतील.

त्यानंतर देशातील भूगर्भ शास्त्रज्ञ आपली मते मांडतील. दुरुस्त संवेदन तंत्र सॅटेलाइटद्वारे छायाचित्रे घेऊन त्यावर अभ्यास केला जाणार आहे. हवामान पिके, वने, पूर व भूकंप या नैसर्गिक आपत्तींबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी सॅटेलाईटचा उपयोग कसा होतो माहिती अचूक व तातडीने कशी मिळते त्याचे विश्लेषण व संस्करण कशा पद्धतीने केले जाते.

त्याचा उपयोग आपत्ती व्यवस्थापन पीक व्यवस्थापन यासाठी कसा केला जाऊ शकतो याबाबत वाटे आपले संशोधन सादर करणार आहेत. या परिषदेसाठी बाठे यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन. डी यांनी अभिनंदन केले आहे.

Ishwar Bathe
Nashik NCP News: राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी अनिता दामले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.