नाशिक : विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी (ता.९) घेतलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तब्बल ११ हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यावेळी दावा दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरण यांतून ८० कोटी ५४ लाख ६१ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले आहे.
दरम्यान प्रकरणांचा निपटारा झाल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. (National Peoples Court Settlement of 11 thousand cases in Peoples Court 80 crores and 54 lakhs recovery of compromise duty nashik)
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे जिल्ह्यातील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होती.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत पार पडली. यावेळी प्रलंबित व दावादाखल पूर्व अशा ११ हजार ०१३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.
दावा दाखलपूर्व प्रकरणांतून एक लाख १७४ प्रकरणे ठेवलेली असताना, यातून आठ हजार ६८७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.
यातून १९ कोटी ५५ लाख ३५ हजार रुपयांची शुल्क वसुल झाले. विविध कारणांनी दुरावलेले कुटुंब यानिमित्त एकत्र आल्याचे बघायला मिळाले. ९५ कुटुंब लोकअदालतीतून पुन्हा एकत्र आले आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर आणि जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील व पक्षकार उपस्थित होते.
अपघातातील घटनांतून सव्वा कोटींची तडजोड
खासगी बसने नाशिक-अहमदाबाददरम्यान प्रवास करताना ट्रकने दिलेल्या धडकेमुळे दुखापत होऊन प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
लोकअदालतीत झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश यु. जे. मोरे यांच्या पॅनलमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, जिल्हा न्यायाधीश एन. व्ही. जीवने यांच्या मदतीने विमा कंपनीला मृताच्या वारसांना एक कोटी २१ लाख रुपये रक्कम तडजोडीने देण्याचे आदेश जारी केले.
तसेच मोटार अपघात प्रकरणांतील ९८२ प्रकरणांपैकी २६५ प्रकरणे निकाली काढले. वेगवेगळ्या अपघातांमध्ये जखमी व्यक्ती, किंवा मृतांच्या वारसांना सुमारे १५ कोटी १३ लाख २४ हजार रुपये तडजोड स्वरूपात देण्यात आले.
निपटारा झालेल्या प्रकरणांचा तपशील
धनादेश न वटलेले (चेकबाऊन्स) ६७०
अपघात- २६५
कामगारांचे प्रश्न- ६
कौटुंबिक वादाची प्रकरणे- ९५
फौजदारी तडजोडी-२६८
इतर प्रकरणे- १ हजार २२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.