National School Kho-Kho Tournament: महाराष्ट्राची घोडदौड सुरूच! मुले, मुली संघाचा बादफेरीत प्रवेश

A tense moment from Wednesday's match at the Schools National Kho-Kho Tournament.
A tense moment from Wednesday's match at the Schools National Kho-Kho Tournament.esakal
Updated on

नाशिक : विभागीय क्रीडा संकुल येथे मॅटवर खेळविण्यात येत असलेल्या १९ वर्षाआतील गटाच्‍या ६७ व्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्‍पर्धेत बुधवारी (ता. १३) दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची घोडदौड सुरू राहिली.

कामगिरीच्‍या जोरावर महाराष्ट्राच्‍या मुले व मुलींनी आपापल्या गटातून आघाडी घेताना बादफेरीत प्रवेश केला आहे. यासोबत संघांची विजेतेपदाकडे कूच सुरू आहे. (National School Kho Kho Tournament Maharashtras race continues Entry of Boys Girls Teams to Finals nashik)

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याअंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आणि खो-खो फेडरेशनच्या सहकार्याने स्‍पर्धा पार पडत आहेत.

बुधवारी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने पुद्दचेरी संघावर १ डाव आणि १७ गुण अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अ गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्राकडून नाशिकच्या सरिता दिवाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.

प्रतीक्षा बिरासदार, प्रीती धाकरंगे, कर्णधार निशा वैजल यांनी चांगल्‍या खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या इ गटातील सामन्यात तमिळनाडूने विद्या भारतीवर विजय मिळविला. तर एफ गटात झारखंडने बिहारला पराभूत केले.

मुलांच्या गटात महाराष्ट्राने तमिळनाडूवर दहा गुण आणि एक डाव राखून मोठा विजय साजरा केला. महाराष्ट्राकडून अजय कश्यप, गणेश बोरकर, चेतन बीका यांनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.

मुलांच्या गटात इ गटातील साखळी सामन्यात उत्तर प्रदेशने पश्चिम बंगालवर तीन गुणांनी विजय मिळविला. एफ गटात झारखंडने विद्या भरतीला चार गुणांनी पराभूत केले. जी गटात तेलंगणाने बिहारवर एक डाव आणि १३ गुणांनी मोठा विजय मिळवत चांगली कामगिरी केली.

A tense moment from Wednesday's match at the Schools National Kho-Kho Tournament.
Rajya Natya Spardha 2023: प्रवृत्तीच्या वर्तमानावर भाष्य ‘ही कशानं धुंदी आली’

गटवार साखळी सामन्यातील निकालानंतर या आठ गटामधील प्रत्येक गटातून पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. या पात्र ठरलेल्या १६ मुलांच्या आणि १६ मुलींच्या संघामध्ये बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत, अशी माहिती तांत्रिक समिती प्रमुख प्रेमचंद चौधरी यांनी दिली.

स्पर्धेला कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जिजाऊ पुरस्कार प्राप्त शैलजा जैन, सिन्नर नगरपरिषदेचे रामभाऊ लोणारे, के. के. वाघ संस्थेचे क्रीडा संचालक एस. एस. ढवळे, नामदेव महात्मे, इचलकरंजी येथील जैन क्रीडा संस्थेचे संचालक अनिल गांजवे, खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू आणि संघटक साधना देशमुख यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्‍छा दिल्या.

मैदान व्यवस्था चोख राखण्यासाठी खो- खो पदाधिकारी मंदार देशमुख, जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवक परीश्रम घेत आहेत. स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच प्रमुख प्रेमचंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंच व्यवस्थित पार पाडत आहेत.

A tense moment from Wednesday's match at the Schools National Kho-Kho Tournament.
National School Kho Kho Competition: ‘सुषमा’ ठरली देशातील सर्वोत्तम खेळाडू; रोहिणीची चमकदार कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.