Natya Parishad Election : नाट्य परिषद निवडणूक वाद; ‘त्या’ चौघांचे सदस्यत्व रद्द होणार?

Natya Parishad Election
Natya Parishad Electionsakal
Updated on

नाशिक : राज्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नाशिक शाखेत वादाचे फटाके फुटले आहेत. नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव डावलून निवडणुकीत अर्ज सादर करणाऱ्या चौघांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र, कार्यकारिणी मंडळाची बैठक एप्रिलमध्ये होणार असल्याने पदाधिकारी तोपर्यंत ‘वेट अॅन्ड वॉच’ च्या भूमिकेत गेल्याचे दिसून येते.

Natya Parishad Election
Marathi Drama : संघर्ष, वेदना दाखवणारे ‘गांधी विरुद्ध गांधी’

नाट्य परिषदेच्या एकूण ६० जागांसाठी येत्या १६ एप्रिलला मतदान होणार आहे. नाशिक शाखेच्या तीन जागांची बिनविरोध निवड करण्याचा ठराव ३० डिसेंबरला झालेल्या सभेत करण्यात आला. या ठरावाची पायमल्ली करत सार्वजनिक वाचनालयाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, प्राजक्त देशमुख, राजेश जाधव व जयेश आपटे यांनी अर्ज दाखल केल्याचा आरोप नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी केला.

त्यांचे अर्ज छाननीत बाद ठरल्याने आता तिघांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलेले नसून नाट्य परिषदेने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत याविषयी सामूहिकरीत्या निर्णय घेण्याची भूमिका सध्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेली दिसते. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेत साधारणतः १३०० सभासद आहेत.

Natya Parishad Election
Marathi Drama : परिस्थितीशी झटणाऱ्यांची कहाणी ‘मुसक्या’

त्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे नाट्य क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या चौघांचे सदस्यत्व रद्द झाल्यास त्यांनी पुढील तयारी म्हणून न्यायालयात जाण्याचा विचार सुरू केल्याने सार्वजनिक वाचनालय पाठोपाठ नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वादही न्यायालयात पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

''कुठल्याही संस्थेचा कारभार हा त्या संस्थेच्या घटनेनुसार चालवला जातो. एखाद्या पदाधिकाऱ्यास वाटले म्हणून त्यांनी ठराव करायचा आणि त्याला विरोध केला म्हणून सदस्यत्व रद्द करायला ही काय मोगलाई आहे का? त्यांनी आमचे सदस्यत्व रद्द केले तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना योग्यवेळी उत्तर देवू.'' - सुरेश गायधनी, परीक्षक तथा नाट्यगृह सचिव, 'सावाना'

Natya Parishad Election
Nashik News : मालेगावात तोतापुरी कैरीची आवक वाढली! लाखोंची उलाढाल

''संस्थेच्या घटनेनुसार शिस्तभंगाची कारवाई करायची की नाही, याविषयी कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत सामूहिकरीत्या निर्णय घेतला जाईल. त्यांचे कृत्य हे घटनेची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे कळत किंवा नकळतपणे त्यांनी चुक केलेली आहे. याविषयी आम्ही कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत चर्चा करणार आहोत.'' - रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.