नाशिक : रंगकर्मींचा नाट्यकुंभ म्हणजे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा. सोमवार (ता. २०)पासून शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या रंगभूमीवर ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचा रणसंग्राम रंगणार आहे.
यंदा नाशिककर नाट्यरसिकांना २२ नाटकांची भरगच्च मेजवानी असेल. रोज सायंकाळी नाटकाचे प्रयोग होणार आहेत. जुन्या अनुभवी तसेच नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांच्या सादरीकरणाचा संगम या नाट्य स्पर्धेत अनुभवण्यास मिळेल.
२० नोव्हेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत सायंकाळी सातला नाट्यरसिकांसाठी नाट्यपर्वणी असणार आहे. (Natya Sangram of state drama competition will be staged from tomorrow feast for lovers of 22 plays nashik)
स्पर्धेत सादर होणारी नाटके अशी
तारीख--------नाटकाचे नाव------लेखक- दिग्दर्शक------संस्थेचे नाव
१) २० नोव्हेंबर-- संगीत अवघडीचे दिवस--ओंकार टिळे--- आपली बांधिलकी सोशल फाउंडेशन, नाशिक
२) २१ : युद्धविराम--- अक्षय संत- आरती प्रभू हिरे---बाबाज् थिएटर, नाशिक
३) २२ : माझा खेळ मांडू दे--सई परांजपे- सुरेखा लहामगे शर्मा--- क्राईम प्रिव्हेन्शन कौन्सिल अॅण्ड इन्वेस्टिगेशन, नाशिक
४) २३ : स्मरणार्थ----गिरीश जुन्नरे- सुरेश गायधनी----दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग, नाशिक
५) २४ : कूस बदलताना---भगवान हिरे- चारुदत्त हिरे---- एच.ए.डब्ल्यू.आर.सी. रंगशाखा, ओझर
६) २५ : विदूषक----प्रभाकर दुपारे- मार्टिन---------हार्ट बिट्झ बहुद्देशीय विकास संस्था, धुळे
७) २६ : प्रथम पुरुष-- संकेत सीमा विश्वास------ कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, नाशिक
८) २७ : उम्मीद--- अभिषेक लोकनार-----लोकहितवादी मंडळ, नाशिक
९) २८ : चोरीला गेलाय--- कृष्णा वाळके- प्रवीण जाधव--------महात्मा गांधी विद्यामंदीर, पंचवटी
१०) २९ : अभि तो मैं जवान हूँ---हेमंत गवळे---मथुरा बहुद्देशीय विकास मंडळ, नाशिक
११) ३० : द कॉन्शन्स--अमेय दक्षिणदास- विनय कटारे---श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुद्देशीय संस्था, नाशिक
१२) १ डिसेंबर : मुंबई मॉन्सून----महेंद्र तेरेदेसाई- राजेश टाकेकर----नम्रता कलाविष्कार बहुद्देशीय संस्था, नाशिक
१३) ४ : धर्ममाया---राजेंद्र पोळ--अविनाश वाघ-----नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्था, नाशिक
१४) ५ : ‘रा + धा =’---- रवींद्र लाखे- श्रीराम जोग-----नाट्यभरती, इंदूर
१५) ६ : कायाचक्र (समीर गायकवाड)---- मृणाल पाटील- समीर तोरसकर----समीज्ञा बहुद्देशीय संस्था
१६) ७ : खेळ मांडियेला----विशाल कदम- विक्रम पाटील---- संकर्षण युवा फाउंडेशन, नाशिक
१७) ८ : काळोख देत हुंकार---दिलीप परदेशी- दिलीप काळे---संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक
१८) ९ : बसवानुभव----राजेंद्र पोळ- चंद्रवदन दीक्षित-----श्री शिव छत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, नाशिक
१९) १० : आपुलाची वाद आपणासी--- समीर मोने- सचिन रहाणे----मायको एम्प्लॉईज फोरम, नाशिक
२०) ११ : दानव---अतुल साळवे- राजेश शर्मा-------सुरभी थिएटर्स, नाशिक
२१) १२ : शरणम् शांती---सतीश कोठेकर- वरुण भोईर----विजय नाट्य मंडळ, नाशिक
२२) १३ : ही कशानं धुंदी आली---रोहित पगारे- भरत कुलकर्णी---विंध्यावासिनी बालविद्या विकास शिक्षण संस्था, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.