Nashik News : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर मंगळवारी (ता. ८) कालाष्टमीनिमित्त आई भगवती मंदिर गाभाऱ्यात फळे, फुले व पानांची आकर्षक आरास केली होती.
‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके’, ‘नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः’च्या मंत्रघोषात नवचंडी याग विधिवत झाला. (Navchandi yag under slogan Attractive Aras at Saptshring Fort Nashik News)
अधिक श्रावण मासानिमित्त आदिमाया सप्तशृंगमातेच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी सुरू असून, अधिक श्रावण मासात देेवीचे दर्शन, पूजा, नवसपूर्तीच्या धार्मिक विधी व कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.
मंगळवार देवीचा वार समजला जात असल्याने, तसेच कालाष्टमीचे धार्मिक महत्त्व साइत मुंबई येथील भाविक सुनील दुसानी यांनी आदिमायेच्या मंदिरात फुले, फळे, पानांची आकर्षक आरास केली होती.
ही आरास करताना डाळिंब, पेरू, पपई, केळी, सफरचंद, अननस, मोसंबी, संत्री, सीताफळ आदी फळांचा, तर गुलाब, शेवंती, माेगरा, झेंडू आदी फुले, फळांच्या पानांचा उपयोग करून मुंबई येथील सजावटकारांनी आरास केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यासाठी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिरप्रमुख प्रशांत निकम, सुनील कासार, पुरोहितांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, मंगळवारी आदिमायेची पंचामृत महापूजा यजमान सुनील दुसानी यांनी कुटुंबीयासमवेत केली. सकाळी नऊला पंचामृत महापूजा झाली. नंतर कालाष्टमीनिमित्त मंदिर सभामंडपात सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे नवचंडी यागास प्रारंभ झाला.
मंदिर पुरोहितांच्या मंत्रघोषात नवचंडी यागाची पूजाविधी झाली. दुपारी चारला यज्ञास पुर्णाहूती देवून सांगता करण्यात आली. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने गडावरील सौंदर्य अधिक खुलून गेल्याने गडावरील भक्तीमय वातावरणात भाविकांनी मनमुराद आनंद लुटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.