Navratri 2021 : कुलस्वामिनीच्या दर्शनाची भाविकांना आस

Saptashrungi Devi
Saptashrungi DeviSakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंगी मातेच्या नवरात्रोत्सवास गुरुवार (ता.७)पासून सुरवात होत आहे. नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेस हजर राहण्यासाठी भाविकांनी ऑनलाइन पास काढले आहेत. दरम्यान, बुधवारी (ता.६) सायंकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल होण्यास सुरवात झाली असून, ट्रस्ट व ग्रामपंचायतीची यंत्रणा नवरोत्सवासाठी सज्ज झाली आहे.

७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या नवरोत्सवात सप्तशृंगीदेवी न्यास व गडावर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सात ते नऊच्या दरम्यान प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते आदिमायेची पंचामृत महापूजा होईल. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई व विश्वस्त मंडळ उपस्थित राहील.

Saptashrungi Devi
नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या

तत्पूर्वी सकाळी सातला न्यासाच्या कार्यालयात देवीच्या दागिन्यांचे पूजन होऊन ब्रह्मवृंदांना वर्दी दिली जाईल. साडेसातला देवीच्या दागिन्यांची कोविड नियमावलीचे पालन करीत सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. देवीचा पंचामृत अभिषेक झाल्यानंतर श्री भगवतीस शालू नेसवून मुकुट, कमरपट्टा पावले, मंगळसूत्र, मोहनमाळ आदी दागिने चढविण्यात येऊन देवीची आरती होईल. सकाळी साडेनऊला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांच्या हस्ते घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल. बुधवारी दिवसभर गडावरील व्यावसायिकांनी हॉटेल, पूजेचे साहित्य व प्रसादाची दुकाने थाटून सज्ज ठेवली होती. नांदुरी गडाच्या पायथ्याशी व गडावरील धोंड्या कोंड्याच्या विहीर परिसरात महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात होती. तसेच खासगी वाहनांसाठी नांदुरी ग्रामपंचायतीने सशुल्क वाहनतळाची व्यवस्था केली आहे. सप्तशृंगी ग्रामपंचायतीतर्फे उत्सवादरम्यान मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सरपंच रमेश पवार, उपसरपंच जयश्री गायकवाड व सदस्यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गडावरून मशाल प्रज्वलित करून आपल्या गावाकडे मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या जिल्ह्यतील देवी मंडळाच्या भाविकांची रीघ लागण्याने नाशिक, पिंपळगाव, कळवण आदी मार्गावरचे रस्ते मशालींच्या प्रकाशाने उजळले होते.

Saptashrungi Devi
नाशिक शहर बससेवेचा नवा विक्रम! एकाच दिवसात ६ लाखांवर उत्पन्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()