Navratri 2023 : यंदा दांडीया आणि गरबासाठी प्रसिद्ध इंदिरानगर -पाथर्डी परिसर शहरातील दांडिया हब म्हणून समोर आला आहे. तब्बल १५ ते १६ ठिकाणी लहान मोठ्या मंडळातर्फे भरघोस बक्षीसांसह दांडियाचे आयोजन केल्याने तरुणाईला मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
स्वखर्चाने मंडळांनी आयोजनात कोणतीही कसर ठेवलेली नाही. यानिमित्त सर्वच पक्ष, नेते शक्तिप्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. (Navratri 2023 Indiranagar area to become Dandiya hub Heavy preparations for Navratri festival nashik)
माजी सभागृहनेते सतीश सोनवणे यांचा युनिक ग्रुप आणि ठाकरे गटाचे हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख सागर देशमुख यांच्यात राणेनगर येथील शारदा शाळेच्या मैदानावर स्पर्धा असेल.
चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशन माध्यमातून माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांचा महिलांचा दांडिया आहे.
महायुतीतर्फे शिंदे गटाचे माजी नगरसेवक अमोल जाधव, सुदाम डेमसे, भाजपचे भगवान दोंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोमनाथ बोराडे यांचा सह्याद्री युवक मंडळ आणि पाथर्डी पंचक्रोशी सांस्कृतिक मंडळाचा दांडिया वासननगर येथील गामने मैदानात आहे.
शंभोनारायण ग्रुपचे शिवा तेलंग, समर्थनगर येथे शिवसेना ठाकरे गट युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे, उपविभाग प्रमुख मदन डेमसे आणि युवा सेना तालुका उपप्रमुख धनंजय गवळी यांची तयारी पूर्ण झाली आहे.
प्रशांतनगर भागात भाजपचे एकनाथ नवले यांचे छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा मंडळ, पाथर्डी फाटा येथे मनसेप्रणित श्री सप्तशृंगी मंडळातर्फे माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, अर्चना जाधव, निकितेश धाकराव आणि संदीप उगले यांची तयारी सुरू आहे.
पांडव नगरी भागात राष्ट्रवादीचे योगेश दिवे यांचे नवदुर्गा मंडळ, माजी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांचे श्री प्रतिष्ठान, दीपालीनगर येथे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख सरप्रीतसिंग बल, माजी नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सचिन कुलकर्णी हे प्रगती महिला मंडळातर्फे नियोजनात आहेत.
मोफत गरबा आणि दांडीया कार्यशाळा घेण्यात येत आहेत. अभिनेत्रींना आमंत्रित केले आहे. दररोज महागडी बक्षीसे ठेवली आहेत. प्रत्येक मंडळाने ठिकठिकाणी कमानी आणि सुशोभीकरण पूर्ण केले आहे.
या व्यतिरिक्त शारदा शाळा, राजीवनगर आणि पांडवलेणी भागात बंगाली बांधवांतर्फे पाच दिवसांचा दुर्गा पूजा महोत्सवदेखील याच परिसरात होणार आहे.
मंडळ प्रतिनिधींची बैठक
इंदिरानगर पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत मंडळ प्रतिनिधींची बैठक घेत नियमांना अधीन राहून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
देशमुख यांनी कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी असे सांगितले आहे.
मंडळ प्रतिनिधींनीदेखील आपले म्हणणे मांडत नियमाप्रमाणे महोत्सव साजरा करण्याबाबत आश्वस्त केले आहे. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सोनार, राम जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.