Navratri 2023 : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सावतील महानवमी उत्सव व कीर्तीध्वज मिरवणूकीसाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून श्री भगवतीचे दर्शन घेतले.
दरम्यान श्री भगवतीच्या कीर्तीध्वजाची आई सप्तशृंगीचा जयघोषात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आज मध्यरात्री कीर्तीध्वज मंदीराच्या डोंगर शिखरावर फडकणार आहॆ. (Navratri 2023 Kirtidhvaj Procession at Saptshringi Fort in Adimaya Chanting nashik)
नवरात्रीची सांगता महानवमीने होते. या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. कमळावर विराजमान माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. महानवमीचा दिवस खूप खास आहे.
या दिवशी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्यापूजा करावी. लहान मुलींना देवीचे रुप मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. याशिवाय नवमीच्या दिवशी हवन करणे देखील शुभ मानले जाते.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या महानवमी निमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त सौ मनज्योत पाटील व देणगीदार भाविक श्री राजू तनवानी यांनी सपत्नीक केली.
सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रसंगी मनसेचे अमित ठाकरे यांनी संकल्प आरती केली.
सालाबाद प्रमाणे अश्र्विन नवमीस सप्तशृंगगडावर देवीच्या शिखरावर मध्यराञी ध्वज लावला जातो. दरेगाव येथील गवळी परिवार या ध्वज लावण्याचे मानकरी असुन गेल्या कित्येक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत असुन, या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही.
सरळ शिखरावर जाणे म्हणेज मुत्युला आंमञण देणे असे आहे पण कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षा पासुन गवळी परिवार पार पाडत आहे. हा सोहळा बघणे म्हणेज डोळयाचे पारणे फेडणारा सोहळा असतो.
या ध्वजाची विधीवत पुजा देवी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बाळासाहेब बी.वाघ, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, विश्वस्त तथा कळवण तहसीलदार श्री रोहिदास वारुळे, विश्वस्त् अॅड. श्री. ललित निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी टेंभेकर सप्तशृंगगड ग्रामपंचायत सरपंच श्री रमेश पवार, गावाचे माजी पोलीस पाटील श्री शशिकांत बेनके यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासकीय प्रतिनिधी, कर्मचारी, पुजारी, रोपवे कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
या ध्वजासाठी मध्यराञी १२ वा शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी १० फुट लांब काठी ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद जाणाऱ्या मार्गातील विविध ठिक ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते.
काल दुपारी ४.०० वा. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात किर्ती ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते करून किर्तीध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर हा ध्वज फडकिविण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील मार्गस्थ झाले.
समुद्र सपाटीपासून ४५६९ फुट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून दोन वेळा हा किर्तिध्वज सप्तशृंगी देवीच्या शिखरावर फडकीवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकीवले जाते.
दरेगावचे गवळी पाटील, सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात. जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यांदी वस्तू ध्वज फडकीवणार्या कडे दिल्या जातात.
दुपारी साधारण ४.३० च्या सुमारास गावातून किर्तीध्वजाची वाजत गाजत मिरवणूक निघाली. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून पाटील देवीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर पुढील मार्गासाठी रवाना झाले.
या सोहळ्यात उतरेकडील सुळक्यावरून पाटील शिखरावर पोचतात, रात्र असतानाही त्यांनी टेंभा किवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण सोबत न घेता ते जातात. पाटील ज्या शिखरावर जातात तो रस्ता बऱ्याच भाविकांनी शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो अपयशी ठरला किवा कुन्हा समोर नाही आला. शिखरावर पोचल्यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज लावला.
शिखरावर चढण्यासाठी त्यांना ६ ते ७ तासाचा कालवधी लागतो दरेगावचे गवळी पाटील पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान शिखरावरून त्यांचे मंदिरात आगमन होताच भाविक दर्शन घेऊन आज परतीच्या मार्गाला लागतील.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या परंपरेला वैशिष्ट्य मानले जाते ५०० ते ६०० वर्षापेक्षा आधिक हि परंपरा राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीच्या पवननगरीत अखंडपणे चालू आहे.
दरम्यान देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी पाचला शतचंडी याग व होमहवन विधी कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी खान्देस, मराठवाडा, विदर्भ नव्हेच तर गुजरात, राजस्थान व ईतर राज्यातून भाविकांनी हजेरी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.