पंचवटी (जि. नाशिक) : अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदाघाटावरील सांडव्यावरील देवी मंदिरात सोमवार (ता. २६)पासून नवरात्रोत्सवास सुरवात झाली. देवी मंदिरमागे असलेल्या कालभैरव मंदिरालगत अनेक महिलांनी घट मांडले आहेत. देवीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली असून, घटस्थापनेच्या दिवशी मंदिर गाभाऱ्यात पान व फुलांची सजावट केली होती. (Navratri festival 2022 begin at sandhya varchi Devi Mandir nashik Latest Marathi News)
दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी मंदिराभोवती मंडप टाकला आहे. मंदिराच्या मागील बाजूस कालभैरव मंदिराजवळ महिला भाविकांसाठी घट मांडण्यासाठी विशेष सोय केली असून, सोमवारी अनेक महिला भाविक मनोभावे घटस्थापन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यानिमित्त मंदिरात दैनंदिन कार्यक्रमात नवचंडी पाठ, नऊ कुमारीकांचे पूजन, गोंधळ, महिला भजनी मंडळाचे भजन आदी कार्यक्रमासह अष्टमीला होमहवन, नवचंडी होम आणि नंतर पूर्णाहुती होणार आहे. देवीला साजशृंगार करून चांदीची विविध आभूषणे चढविण्यात आली आहेत. त्यात गदा, धनुष्यबाण, तलवार, कमंडलू, त्रिशूळ, परशू आदींची दागिन्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.