Navratri 2023 : शहर व परिसरात रविवारी (ता. १५) नवरात्रोत्साहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील १६ देवींचे मंदिर, उपनगरातील पाच देवींच्या मंदिरात एकूण २१ मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली.
सर्व मंदिरांवर व देवीच्या गाभाऱ्यात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सिन्नरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या गावाबाहेरील भगवतीदेवी मंदिरातही घटस्थापना झाली. रविवारी पहाटे पाचपासूनच देवी भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. (Navratri festival begins in Sinnar with great fanfare Crowd of devotees for darshan nashik)
सप्तशृंगी गडावर मशाल ज्योत आणण्यासाठी देवी भक्तांनी रात्री बाराच्या सुमारास गडाकडे प्रस्थान केले. सप्तशृंगी गडावरून रात्री दोनला देवीचे दर्शन घेऊन मशाल ज्योत घेऊन देवी भक्त सिन्नरकडे निघाले.
शहरातील देवी भगवती आरती मंडळाच्या विवेक तेलंग, शाहू वरंदळ, मोना नवले यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांनी मशाल ज्योत सकाळी सातला श्री भगवतीदेवी मंदिरात आणली. फटाक्यांच्या आतिषबाजीत मशाल ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले.
त्याचबरोबर लोणारवाडी, भाटवाडी, कुंदेवाडी व शहरातील मंडळांनी मशाल ज्योती आणल्या. पहाटे पाचसूनच देवी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. गावाबाहेरील श्री भगवतीदेवीसाठी अनेक वर्षांपासून राहुल कांतिलाल क्षत्रिय मोठा पुष्पहार अर्पण करतात.
त्यांनी पुष्पहार ढोलताशाच्या गजरात गणेश पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका कॉर्नर, लाल चौक, नाशिक वेसमार्गे देवी मंदिरामध्ये आणून देवीस अर्पण केला.
या ठिकाणी स्त्री व पुरुष दहा दिवस घटी बसतात. दुपारी बारापर्यंत ते रात्री उशिरापर्यंत घटी बसणारे स्त्री, पुरुष आपले घट मांडीत होते. देवी मंदिराच्या परिसरात पूजासाहित्य, फूल, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटली आहेत.
देवी मंदिर परिसर, ऐश्वर्या गार्डन परिसर, आडवा फाटा परिसर, खासदार पुलावर ब्रॅकेट्स बसविले आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
श्री भगवतीदेवी आरती मंडळातर्फे सकाळी साडेआठ व रात्री साडेआठला देवीची महाआरती करण्यात येते. मागील वर्षी पंचमीला देवीच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावर्षी पंचमीला देवीला अभिषेक, भजने व प्रसाद ठेवण्यात येणार असल्याचे ट्रस्तर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.