Navratri 2023 : ग्रामदैवत श्री कालिका देवी यात्रोत्सवाला रविवारी (ता. १५) मंगलयम वातावरणात व भाविकांच्या प्रचंड उत्साहात प्रारंभ झाला.
पहाटेच्या काकड आरतीनंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते महापूजा, आरतीनंतर दिवसभर भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
यात्रोत्सवनिमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणावर खेळणी, खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. (Navratri Maha Puja by Revenue Commissioner first day thousands of devotees flocked to Kalikamata Nashik)
कधीकाळी शहराच्या वेशीवर असलेले कालिका मंदिर वाढत्या शहरीकरणाने शहराच्या मध्यवस्तीत आले आहे. पहिल्या दिवशीची गर्दी लक्षात येते पुढील नऊ दिवस लाखो भाविक दर्शनासाठी येतील.
त्यांच्या सुलभ दर्शनासाठी विश्वस्त मंडळ चोवीस तास कार्यरत असल्याचे संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त परिसरात खाद्यपदार्थ व विविध खेळणीचे स्टॉल लावण्यात आले आहे. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांनी गर्दी केली होती. गडकरी चौकासह संदीप हॉटेल कॉर्नरजवळ वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या हाहाकाराने मंदिर बंदच होते, गेल्या वर्षी काही निर्बंधे होती, परंतु यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने संपूर्ण यात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज गृहित धरत देवस्थानतर्फे परिसरात पन्नास सीसी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारे गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे.
याशिवाय भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चाळीस महिला बाऊन्सरसह शंबर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिरावर केलेल्या आकर्षक रोषणाईने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे.
देवीचे दागिने व भाविकांचा तीन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. भाविकांच्या मागणीनुसार यावर्षी प्रथमच यात्रोत्सवाचा कालावधी कोजागिरीपर्यंत वाढविण्यात आला आहे.
गोगाबाबा भक्त मंडळाचे ध्वजारोहण
गोगाबाबा भक्त मंडळातर्फे दर वर्षी ध्वजकाठीची मंदिराच्या परिसरात स्थापना करण्यात येते. रविवारी सकाळी रामतीर्थात ध्वजकाठीला स्नान घालून व विविधत पूजन करत सवाद्य कालिका देवी मंदिरात आणण्यात आली.
त्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, देवस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन होऊन त्याची विधिवत स्थापना करण्यात आली. या वेळी गोगाबाबा भक्त मंडळासह भाविक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.