Navratri 2023: सप्तशृंगी गडावर नवरोत्सवाची तयारी सुरू! प्रशासन लागले कामाला

Preparations for Navarotsav are underway at Saptshringi Fort!
Officials present at the meeting held in the background of Navarotsav.
Officials present at the meeting held in the background of Navarotsav.esakal
Updated on

Navratri 2023 : श्री सप्तशृंग निवासिनी देवी नवरात्रोत्सव १५ ते २४ ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमा (कावड यात्रा) उत्सव २७ व २८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.

नवरात्रोत्साचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखणे, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्यप्रकारे नियंत्रण, आवश्यक ते मदत कार्याबाबत निर्धारित पूर्तता होण्यासाठी कळवणचे प्रांत विशाल नलवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट कार्यालयात विविध विभागप्रमुख, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगी गड व नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी, ग्रामस्थ प्रतिनिधींची बैठक गुरुवारी (ता. ७) झाली. (Navratri preparations begin at Saptshringi gad Administration started working nashik)

प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले. कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक के. टेंभेकर, आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले, वन विभाग अधिकारी दीपाली गायकवाड, गड व नांदुरी सरपंच व सदस्य, गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे विश्वस्त ललित निकम, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, मंदिर पर्यवेक्षक प्रशांत निकम, सुरक्षा विभागाचे यशवंत देशमुख, उपकार्यालय विभागप्रमुख गोविंद निकम व अधिकारी उपस्थित होते.

नवरात्रोत्सवात भाविकांना पहिली पायरीपासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

तात्पुरते स्वछतागृह, अग्निशमन बंब, आपत्ती व्यवस्था, साफसफाई, फ्यूनिक्युलर रोप वे प्रकल्पसंदर्भीय गर्दी व सुलभ दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी केली.

नांदुरी ते सप्तशृंग गडापर्यंत जाण्यासाठी जादा बस धावतील, अशी माहिती परिवहन मंडळाने दिली. अप्पर जिल्हाधिकारी विशाल नरवडे यांनी अनुभवी बसचालक, उत्तम परिस्थितीत असलेल्या बस, वापरण्यात येणाऱ्या बसची पूर्ण तपासणी करूनच त्या वापराव्यात, असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials present at the meeting held in the background of Navarotsav.
Nashik News: नामपूर बाजार समितीसाठी 9 अर्ज दाखल; 127 अर्जांची विक्री

रस्ता दुरुस्ती तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश श्री. नरवडे यांनी दिले. यात्रोत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला.

नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना करयात आली. आपत्कालीन परिस्थितीसाठी तंत्रज्ञ आणि क्रेनही सज्ज ठेवावेत.

वन विभागाच्या जागेत दुकाने लावून अतिक्रमण होणार नाही, तसेच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून ते मोकळे होणे आवश्यक आहे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन बंब रस्त्यावरून जाऊ शकेल, याची दक्षता घ्यावी.

रोज ७५ ते ८० हजार भाविक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करीत असून, दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसा औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात यावा, असे अनेक सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Officials present at the meeting held in the background of Navarotsav.
Nashik News: सांगा आता जगायचं तरी कसे? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल! टोमॅटोचा झाला लाल चिखल,भावात निचांकी घसरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.