Navratri 2023 : भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारी सटाण्याची महालक्ष्मी माता

navratri special article Mahalakshmi Mata of Satana nashik
navratri special article Mahalakshmi Mata of Satana nashik esakal
Updated on

सटाण्याची महालक्ष्मी ही राजधानी मुल्हेर गडावरील विश्वेश्वर म्हणून प्रसिद्ध होती. इ.स १५९० मध्ये मुल्हेर नरेश नारायण शहा राठोड या बागूल राजाने झंझ राजांकडून ही मूर्ती आणली होती. तिचे मुल्हेर गडावर मोठे मंदिर होते. मोगल आक्रमणामुळे मुल्हेर गडावरील काही मूर्ती मोती टाक्यात लपवण्यात आल्या.

पुढे मोती टाका साफ करताना त्यातून काढण्यात आलेल्या २१ मूर्तीत श्री प्रद्युम्न नारायण, महालक्ष्मी, सत्यभामा विग्रह, गोवर्धन श्रीकृष्ण, भवानी देवी, कठगडची अंबिका, त्रिपुर सुंदरी, राम, लक्ष्मण, गणपतीच्या ६ मूर्ती, विठ्ठल मूर्ती व मारोतीरायांच्या ५ मूर्ती होत्या. त्या मूर्तींच्या प्रकटीकरणानिमित्त श्री उद्धव महाराज संस्थानचे मठाधिपती श्री विष्णुदास पंडित महाराजांनी १८७५ मध्ये चैत्र महिन्यात विष्णूयाग यज्ञाचे आयोजन केले. (navratri special article Mahalakshmi Mata of Satana nashik )

त्या यागासाठी २० संस्थानचे संस्थानिक राजे आले होते. २१ यजमानांमध्ये देवमामलेदार यशवंतराव महाराजही होते. पूजा आटोपल्यानंतर श्री यशवंतराव महाराजांनी महालक्ष्मी देवीकडे बघून, ही साक्षात ‘कोल्हापूरची अंबाबाई’ असे गौरवोद्गार काढले आणि यजमानपदाच्या बदल्यात त्यांनी महालक्ष्मी आणि सत्यभामा विग्रह सटाण्यात आणले. पैकी महालक्ष्मी देवी सटाण्याची ग्रामदैवत अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात स्थापन झाली आणि सत्यभामा विग्रह पंडितांच्या राममंदिरात स्थापन झाली.

सटाणा शहरात आरमतीरावर महालक्ष्मी देवीची मूर्ती विलक्षण सुंदर आहे. देवी समपाद स्थितीत उभी असून डोक्यावर धम्मिला मुकुट धारण केला आहे. मुकुटावरील सर्वांत वरील भागात सूर्य-चंद्र असून खालील थरात शिवलिंग आहे. मुकूट अनंत नागवेष्टित आहे. कपाळावर लतावल्लिका असून कानात सूर्यवृत्त प्रकारात मकर कुंडले धारण केले आहे. देवीने उजवीकडील खालील हातात व्याख्यान मुद्रेत म्हाळूंग फळ पकडले आहे.

वरील हातातील तर्जनी मुद्रेत कौमोदिकी गदा धारण केली आहे. डावीकडील वरील हातात कटक मुद्रेत ढाल धारण केली आहे. डावीकडील खालील हातात सूची मुद्रेत अमृतपात्र / पानपात्र धारण केले आहे.

कपड्यांमध्ये तिने स्तनसूत्र व पादवलय धारण केले असून त्यावर दागिन्यांमध्ये वरील भागात हरिसूत्र धारण केले आहे.

navratri special article Mahalakshmi Mata of Satana nashik
Kotamgaon Jagdamba Mata : 3 रूपांतील कोटमगावची जगदंबा माता

कटी वस्त्रावर कटीसूत्र, उरूद्दाम, मुक्तदाम, वनमाला व यज्ञोपवित धारण केले आहे. हातात कडे धारण केले असून पायात पैंजण घातले आहे. पायाजवळ डाव्या बाजूला खाली भक्त स्वरुपात भृगू ऋषी / श्री भक्त दाखवले आहे.

संपूर्ण मूर्ती एक पाषाणात कोरली असून मूर्तीचा पाषाण तैलंगी स्वरूपातील आहे. मूर्तीला कान लावल्यास समुद्राच्या लाटांसारखा आवाज येतो. देवी सदैव स्मित हास्य करीत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी देवीचा वरदहस्तच की काय म्हणून सटाण्यात जेवण उरून राहते पण संपत नाही.

सटाण्यात कोणी उपाशी राहत नाही. ज्यांनी वसा आणि वारसा धरून ठेवला आहे त्यांना काही कमी पडत नाही. कोल्हापूरप्रमाणे सटाण्याच्याही महालक्ष्मी देवीमूर्तीवर कार्तिक महिन्यात सूर्य किरणे पडतात. आज मंदिर व मूर्तीची पूजाअर्चा योगेश चंद्रात्रे व कुटुंबीय पिढ्यानपिढ्या करीत आहेत. महालक्ष्मी देवी देवस्थानचे सर्व विश्वस्त उत्तमरीत्या देखभाल व उत्सव साजरा करीत आहेत.

यंदाच्या नवरात्रोत्सवात आईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असून दररोज पहाटे पाचला काकड आरती, सकाळी आठला अभिषेक तर रात्री आठला महाआरती व रात्री दहाला निद्रा आरती होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवस्थानतर्फे शतचंडी यज्ञ सुरू असून मंगळवारी (ता.२४) विजयादशमीच्या मुहूर्तावर पूर्णाहुती होणार आहे.

navratri special article Mahalakshmi Mata of Satana nashik
Navratri 2023 : आठवी माळ, भगवान महादेवांनी चेष्टा केली म्हणून देवी पार्वतीला मिळालं महागौरी रूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()