Navratrotsav 2023 : गणेशोत्सवानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून, घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून, मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे.
रविवारी (ता. १५) नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. (Navratrotsav 2023 Sculptors final touch on Goddess idol Various works in final stage nashik)
यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही वाढली आहे. त्यांच्याकडून देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत.
तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पाच ते सहा दिवसात त्यांचेही काम पूर्ण होणार आहे.
अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्यासह विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. ८ इंचापासून ७ फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहे. ५०० ते २१ हजारपर्यंत दर आहेत.
सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरनी अशा विविध मुर्ती तयार करण्यात आल्या आहे. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये ५० रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्य खर्चामुळे मूर्तीच्या दरांमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना ५० टक्क्यांनी मागणी वाढली आहे.
ग्रामीण भागातून वाढली मागणी
पुरेसा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागात संकटमय परिस्थिती होती. गणेशोत्सवावर ग्रामीण भागात त्याचा काहीसा परिणाम दिसून आला. गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे नवरात्र साजरी करण्यास घेऊन त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली आहे. सुमारे २० टक्क्याने ग्रामीण भागातून मूर्तीस मागणी वाढली आहे.
"कोरोना प्रादुर्भाव तसेच अन्य निर्बंधामुळे गेली दोन ते अडीच वर्ष मूर्तिकारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यंदा उत्सव साजरा करण्यास कुठलीही अडचण नसल्याने झालेले नुकसान काहीसे भरून निघण्याची शक्यता आहे. मूर्तीच्या दरांमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे."
- रवींद्र परदेशी, मूर्तिकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.