नाशिक : राज्य शासनाने राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले असून आदिवासी विकास आयुक्तपदी गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना खांडेकर- गुंडे यांची नियुक्ती झाली आहे. आयुक्त हिरालाल सोनवणे यांची मुंबईतील दुग्ध विकास विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. श्रीमती गुंडे यांनी नाशिकमध्ये उपजिल्हाधिकारी, म्हाडा तसेच मुंद्राक शुल्क या विभागात काम केले आहे. त्या येत्या सोमवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
आदिवासी विकास आयुक्तपदी हिरालाल सोनवणे यांची १९ सप्टेंबर २०२० ला नियुक्ती झाली होती. सव्वादोन वर्षातच त्यांची या विभागातून बदली झाली असून गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची त्या पदावर नियुक्ती झाली आहे. लष्करातील निवृत्त मेजर शंकरराव खांडेकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झाले. १९९२ मध्ये त्या प्रशासकीय सेवेत रूजू झाल्या.
कुर्डुवाडी व सोलापूर येथे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. गुंडे यांनी आधीही नाशिकमध्ये म्हाडाच्या विभागीय अधिकारीपदी काम केले आहे. त्यानंतर मुंद्राक शुल्क विभागात डिआयजी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी या पदावरही त्यांनी काम केले आहे.
२०१६ मध्ये आयएएस कॅडरमध्ये त्यांचा समावेश झाल्यानंतर नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली होती. वर्धा सीईओ, यशदा या ठिकाणीही त्यांनी काम केले आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांची राज्यातील आदिवासींचे मुख्यालय असलेल्या आदिवासी आयुक्तालयात आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.