Jayant Patil Suspension : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाने NCP आक्रमक!

agitation
agitationesakal
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबन केल्याने नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी भवन येथे जोरदार निदर्शने केली. यावेळी “निर्ल्लज सरकारचा निषेध असो”, “५० खोके एकदम ओके”, “इडी सरकार हाय हाय” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, अंबादास खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, संजय खैरनार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे आदि उपस्थित होते. (NCP aggressive in city with suspension of state president Jayant Patil at winter convention nashik news)

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याने आपले प्रश्न मांडण्यासाठी विरोधक आमदार प्रयत्नशील असतात. परंतु सत्ताधारी अनेक प्रश्न बाजूला सारत असल्याने विरोधक आमदार आक्रमक होताना दिसत आहे.

महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची व महापुरुषांची बदनामी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आदि मुद्द्यांवर चर्चा होत नसल्याने तसेच दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत सदनांत “असा निर्लज्जपणा करू नका” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केल्याने त्यांच्यावर हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

agitation
Corona Update : सप्तशृंगी गडावर आजपासून ‘मास्क’ बंधनकारक

परंतु हे विधान त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून न बोलता शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून बोलल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याची दिसून येत आहे.

या प्रसंगी सलीम शेख, डॉ. योगेश गोसावी, किशोरी खैरनार, बाळासाहेब गीते, मनोहर कोरडे, नदीम शेख, सुनिल अहिरे, माजी नगरसेवक जगदीश पवार, राजेंद्र शेळके, योगेश दिवे, नाना पवार, प्रकाश थामेत, पूजा आहेर, योगिता पाटील, रुपाली पठाडे, शादाब सय्यद, बाळा निगळ, राहुल कमानकर, अमोल नाईक, किरण पानकर, कुलदीप जेजुरकर, महेश शेळके, रियान शेख, योगेश इंगोळे, प्रथमेश पवार, ज्ञानेश्वर महाजन, गणेश गीते, रविंद्र शिंदे, सोपान कडलग, गणेश गायधनी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

agitation
Nashik Crime News : येवल्यातून लाखोंच्या नायलॉन मांजाच्या 240 चकऱ्या जप्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.