राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाएक फोटो कालपासून चांगलाच चर्चेत आला आहे. ते महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत एकाच व्यासपिठावर दिसून आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं होते. ते अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्यासोबत येतील अशा चर्चा सुरू होत्या. अशातच या चर्चेला झिरवळ यांनी पुर्णविराम देत ते कोणासोबत आहेत ते सांगितले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेत्यांसोबत नरहरी झिरवाळ यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नरहरी झिरवाळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून भारती पवार तर मविआकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच दिंडोरीमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ आमदार आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हायरल झालेल्या फोटोवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, "माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार भास्कर भगरे यांचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रहा खातर मी खुर्चीवर बसलो होतो. त्यावेळी शेजारी दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेते येऊन बसले."
"त्यानंतर काही मिनिटामध्येच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी तिथून निघून गेले. मी अजित पवारांसोबतच आहे", असं नरहरी झिरवळ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.