Nashik News: प्रभाग 7 मध्ये दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके; तलावाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी भाजप शिंदे सेना संघर्ष

NCP BJP Shinde Sena clash over plight of swimming pool nashik news
NCP BJP Shinde Sena clash over plight of swimming pool nashik news
Updated on

Nashik News : भाजप व शिवसेनेच्या शिंदे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक ७मधील समर्थनगर जॉगिंग ट्रॅक व जलतरण तलावाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेली स्वाक्षरी मोहीम जिव्हारी लागल्याने मंगळवारी (ता. ७) आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून झाला.

स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद मिळत असताना महापालिकेच्या बांधकाम व अतिक्रमण विभागाने भल्या पहाटे नागरिक आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच स्वाक्षरी आंदोलन मोहिमेचा फलक उचलून नेला. (NCP BJP Shinde Sena clash over plight of swimming pool nashik news)

शासनाच्या निधीतून प्रभाग ७ मधील आकाशवाणी टॉवरजवळील समर्थ जॉगिंग ट्रॅक व जलतरण तलावाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. जॉगिंग ट्रॅक व जलतरण तलाव लोकार्पण सोहळा होण्यापूर्वीच वादात सापडले आहे. समर्थ जॉगिंग ट्रॅक, तरण तलावाची अवस्था लोकार्पण सोहळ्यापूर्वीच दयनीय झाली आहे. तरण तलावात शेवाळे साचले असून, घाण पाण्यामुळे डासांची संख्या वाढली आहे.

ट्रॅक व तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. यंत्रणा धूळखात पडली आहे. चेंजिंग रुममध्ये दारूच्या बाटल्या तसेच गांजा ओढणाऱ्यांचा अड्डा बनले आहे. येथील खोल्या मद्यपींचा अड्डा बनले आहे. काम पूर्ण होऊनदेखील तरण तलाव वापरासाठी खुला केला गेला नाही. या पार्श्वभूमीवर तरण तलाव खुला करावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आला.

NCP BJP Shinde Sena clash over plight of swimming pool nashik news
Khelo India Sport: मनमाडच्या लेकींची सुवर्णभरारी! खेलो इंडियामध्ये आकांक्षाला तीन, दिव्याला एक सुवर्णपदक

त्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. बुधवारी (ता. ८) आंदोलनासाठी नागरिक एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच महापालिकेकडून स्वाक्षरी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणारा फलक उचलून नेण्यात आल्याने आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी स्थानिक भाजप व शिंदे सेनेच्या नेत्यांनी दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.

"तरण तलाव व जॉगिंग ट्रॅकमुळे फायदा कमी तोटाच अधिक दिसून येत आहे. दुरवस्था व मद्यपींमुळे नागरिकांना त्रास होत आहे. याविरोधात आवाज उठविल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने स्थानिक भाजप आमदार, भाजप नगरसेवक व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने सत्तेचा दुरुपयोग करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे." -किशोर शिरसाट, मध्य विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस.

NCP BJP Shinde Sena clash over plight of swimming pool nashik news
Nashik News: क्रिसिलचे महापालिकेला ‘एए- रेटिंग’; बाजारातील खालावलेली पत दाखवून कर्जरोखे उभारण्याचा डाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.