Sharad Pawar Yeola Rally: "माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला"; भुजबळांवर निशाणा साधत पवारांनी मागितली येवलेकरांची माफी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात घेतली.
Sharad Pawar
Sharad Pawar Esakal
Updated on

येवला : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात घेतली. या सभेत त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो अशा शब्दांत त्यांनी येवलेकरांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. (NCP Crisis Sharad Pawar Yeola Nashik Rally targeted on Chhagan Bhujbal)

Sharad Pawar
West Bengal Voilence: हिंसाचाराच्या दहशतीत प. बंगालमध्ये मतदान सुरु; 12 जणांचा मृत्यू

पवार म्हणाले, "महाराष्ट्रात या जिल्ह्यानं अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली. या नाशिकमधील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दुष्काळी भागातील शेतकरी असेल यांच्यावर अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यामुळं आम्ही विचार केला की मुंबईमध्ये काही लोकांना जनतेच्या समोर सादर केल्यानंतर यश मिळवायचं असेल, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचं असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही या येवल्याची निवड केली" (Latest Marathi News)

Sharad Pawar
MP Urination case: CM चौहान यांनी 'त्या' आदिवासी व्यक्तीचे पाय धुतल्यानं सुटणार आरोपी!

मघाशी काही वक्त्यांनी सांगितलं की, पवार साहेबांनी नाव सांगितलं की आम्ही एकदा, दोनदा, तीनदा निवडून दिलं. नावं कधी चुकलं नाही पण एका नावानं घोटाळा झाला. याचा लोकांना वेगळा अनुभव आला. त्यासाठी आज मी इथं आलोय ती कोणावर टीका करण्यासाठी नाही. आज मी इथं माफी मागण्यासाठी आलो आहे. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar
Sharad Pawar Sabha Yeola: वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल... भुजबळांच्या पिचवर पवारांची तुफान बॅटिंग

मी माफी यासाठी मागतोय की माझा अंदाज कधी चुकत नाही. पण इथं माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला, माझ्या विचारावर तुम्ही विश्वास ठेवला त्यामुळं तुम्हाला त्रास झाला. त्यामुळं तुम्हाला यातना झाल्या. तुम्हाला माझ्या निर्णयामुळं यातना झाल्या असतील तर माझं हे कर्तव्य आहे की तुमच्या सर्वांची माफी मागायला हवी. कधी पुन्हा तुमच्या समोर जायची वेळ येईल आज येईल, उद्या येईल, परवा येईल, महिन्यानं येईल, वर्षानं येईल तेव्हा पुन्हा इथं येईल, पुन्हा इथं येऊन चूक करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.