नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या (elections) अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) संघटनेतील समावेशासाठी नव्या चेहऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, तालुकाध्यक्ष अन् शहराध्यक्षांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये (video conference) निष्क्रीयांच्या पदमुक्तीची जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पगार (adv. ravindra pagar) यांनी तंबी दिली. संघटनेच्या पुनर्रचना मान्यतेसाठी येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्हा कार्यालयाला सादर करण्याची सूचना पगार यांनी केली. ते म्हणाले, की पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा समावेश करतानाच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नव्या कार्यक्षम कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारिणीत संधी द्यावी. आगामी काळातील जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, राष्ट्रवादी सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण सेलचे राहुल सालगुडे, विजय पवार, बागलाण विधानसभा अध्यक्ष माजी आमदार संजय चव्हाण, दिंडोरी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विनोद चव्हाण, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष जयदत्त होळकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, नांदगाव शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर, चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.