कार्य परिचय :
सात वेळा विधानसभा सदस्य असलेले कॉ. जीवा पांडू गावित यांचा पराभव करून पहिल्या प्रयत्नात विधानसभेत प्रवेश. कळवण नगरपंचायत सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश. जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात मतदारसंघात के. टी. वेअर बंधारे, छोटे पाझर तलाव, असे १०० पेक्षा जास्त तलाव, बंधारे बांधले असून त्यातून ५०० ते ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश. सन २०१४ ते २०१९ दरम्यान राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेत असतांना कळवण पंचायत समिती,जिल्हा परिषदेचे ४ गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणण्यात यश. (NCP Nitin Pawar ticket confirmed for kalwan vidhan sabha 2024 election Check maharashtra assembly elections candidate details )