NCP Political Crisis: तालुका पुनर्बांधणीचे नितीन पवारांपुढे आव्हान!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार
MLA Nitin Pawar
MLA Nitin Pawaresakal
Updated on

NCP Political Crisis : बुधवारी (ता.५) मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये कळवण सुरगाणा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवार यांच्या बैठकीस तर तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणे पसंत केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घडलेल्या या राजकीय हालचालीनंतर आता कळवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी जरी अजित पवार यांच्या बाजूने असले तरी शरद पवार यांना समर्थन देणारा गटही मोठा आहे.

त्यामुळे आगामी पाश्‍र्वभूमीवर तालुक्यातील आपली पकड आणखी मजबूत करण्याचे आणि पक्ष पुनर्बांधणीचे मोठे आव्हान आमदार नितीन पवार यांच्यासमोर उभे ठाकले आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या या दोन गटामुळे तालुक्यातील राजकारण मात्र ढवळून निघणार यात शंका नाही. (NCP Political Crisis Taluka reconstruction challenge in front of Nitin Pawar nashik)

शिंदे सरकारच्या काळात कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघातील विकास खुंटला होता. महाविकास आघाडी सरकारने मतदार संघातील मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती दिली होती.

कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचनाबरोबर रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य संदर्भातील कोट्यावधी रुपयांचे प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तावित आहे.

या प्रस्तावांना शासनाची प्रशासकीय मान्यतासह निधीची तरतूद व कळवण सुरगाणा मतदार संघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत कळवण- सुरगाणा आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणे पसंत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ निशाणी नशिबात असल्यामुळे शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व मला लाभले. अजित पवार यांच्या बरोबर आज आहे, उद्या पण आहे आणि भविष्यात देखील बरोबर राहणार आहे.

कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून आमची भावकी असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कळवण शहरातील विविध विकासकामासाठी व शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेला निधी, प्रशासकीय इमारतीसाठी निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून कळवण नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे नगराध्यक्ष कौतिक पगार व नगरसेवक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन करून मुंबईत बैठकीला हजेरी लावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Nitin Pawar
Ajit Pawar: शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजितदादांच्या गळाला

कळवणचे आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार व नगरसेवक व शहरातील, ग्रामीण भागातील पदाधिकारी तसेच लोकनेते ए.टी.पवार कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व संचालक मंडळातील सदस्य अजितदादा पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते.

दुसरीकडे तालुक्यात शरद पवार यांना मानणारा गटही मोठ्या संख्येत असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत असून आम्ही त्यांना मानतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे.

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, विलास रौंदळ, शशिकांत हिरे, जयदीप पाटील या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते यांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिले.

मात्र तालुक्यात तयार झालेल्या या दोन गटामुळे तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. येणाऱ्या काळात आमदार नितीन पवार यांना मतदार संघातील आपली ताकद वाढवून पक्ष पुनर्बांधणी करण्याचे आवाहन नक्कीच राहणार आहे.

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात कळवण-सुरगाणा तालुक्यात मोठया प्रमाणात निधी आला. विकासकामे सुरु झाली. मात्र गेल्या वर्षभरात विकासकामासाठी एक रुपया निधी मिळाला नाही. विकासकामांना स्थगिती दिली गेली. विकासकामे होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन आमदार नितीन पवार यांनी करणे काळाची गरज आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा, प्रलंबित सिंचन प्रकल्प, विकासकामे मार्गी लागतील."

- धनंजय पवार, सभापती कळवण कृउबा

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून कुटुंबप्रमुख शरद पवार हे आमचे दैवत आहे. कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे शरद पवार यांच्या विचारधारेबरोबर असल्यामुळे कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. आमदार नितीन पवार यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार."

राजेंद्र भामरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस कळवण

MLA Nitin Pawar
Ajit Pawar NCP : अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी 'ही' बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.