Nashik NCP News : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.
त्यामुळे राष्टवादी काँग्रेस पक्षाची शहरातील अवस्था आधीच तोळामासा झालेली असताना पक्षाची पंचवटीत व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील स्थिती व अस्तित्व अधिकच धूसर झाले आहे. (ncp status and existence of ncp in Panchavati and Nashik East Assembly Constituency has become gray news)
नाशिक पूर्व मतदारसंघात पंचवटी गावठाण, आडगाव, म्हसरूळ या मोठ्या गावांसह नाशिक रोडचा बराचसा भागाचा समावेश आहे. यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपलाच जनतेचा कौल मिळालेला आहे. एवढेच नव्हे तर गत मनपा निवडणुकीत या भागातून भाजपचेच बहुसंख्य नगरसेवक निवडून आले होते.
तेव्हापासून नाशिक पूर्वमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचेही फारसे अस्तित्व नव्हते. परंतु काही भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांमुळे पूर्वमध्ये पक्षाचे अस्तित्व काही प्रमाणात टिकून होते. आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने नाशिक पूर्वमधील भुजबळ यांच्या कट्टर समर्थकांनीही तोच मार्ग अवलंबिला आहे.
त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील थोडेफार अस्तित्व असलेल्या राष्ट्रवादीला नाशिक पूर्वमध्ये वालीच राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे. ‘ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हाच आमचा पक्ष अन निष्ठाही’ ही भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या युवक शहराध्यक्षांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यातच पूर्वमधील राष्टवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते ‘नॉट रिचेबल’ असल्याने नेमके कोण कोणाबरोबर याबाबतही संभ्रमावस्था आहे.
सुरेश खेताडे ठरले पहिले लोकप्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९९९ ला झालेल्या निर्मितीनंतर नाशिक महापालिकेच्या पंचवटीतील पोटनिवडणुकीत राष्टवादी काँग्रेसचे सुरेश खेताडे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे पक्षाच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने सुरेश खेताडे हे पहिले लोकप्रतिनिधी ठरले होते. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून १९९७ मध्ये मनपा निवडणुकीत श्री. खेताडे यांना अपक्ष म्हणून घड्याळ हेच चिन्ह मिळाले होते, त्या निवडणुकीत ते काँग्रेस उमेदवाराकडून अवघ्या १८८ मतांनी पराभूत झाले.
त्यानंतर १९९९ ला झालेल्या पोटनिवडणुकीत श्री. खेताडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले. या निवडणुकीत श्री. खेताडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला लोकप्रतिनिधी म्हणून श्री. खेताडे यांचा राज्यभर बोलबाला झाला होता. त्यानंतर श्री. खेताडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली अन निवडणूकही जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.