काय चाललंय पक्षात? : NCPला व्हायचंय किंगमेकर..!

ncp latest marathi political news
ncp latest marathi political newssakal
Updated on

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) बदलती राजकीय परिस्थिती व आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत (NMC) नव्याने गणिते मांडली जात आहेत. सत्तेपर्यंत पोचण्याइतपत नसला तरी किमान किंगमेकर म्हणून भूमिका बजावता येईल अशा स्थितीत येण्यासाठी पक्षाच्या रणनीतीकारांकडून व्यूहरचना आखली जात आहे. (NCP wants to be kingmaker Nashik Political Latest Marathi News)

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नगण्य असली, तरी ताकद वाढविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत फार प्रयत्न झाले असे नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पक्षाकडे पालकमंत्रिपद आले.

छगन भुजबळ यांच्या माध्यमातून भुजबळ फार्मवर पक्षाच्या बैठका होत असल्याने जिवंतपणा दिसून आला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेच्या विषयांवर पत्रकबाजी करण्याबरोबरच शासनस्तरावर प्रश्‍न मांडण्यात आले.

चुकीच्या कामाविरोधात आंदोलने करण्यात आली तर पालकमंत्री या नात्याने भुजबळ यांनी पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवले. त्यामुळे एकूणच संख्येने ताकद कमी असली तरी सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा वचक ठेवला. महापालिकेचे सभागृह, सभागृहाबाहेर राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरली.

युवक काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेसह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रश्‍नांवर आंदोलने करण्यात आल्याने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत गेली. एकीकडे पक्षीय पातळीवर जिवंतपणा कायम ठेवत असताना संघटनात्मकदृष्ट्यादेखील पक्ष दुबळा झाला नाही किंवा होऊ दिला नाही; परंतु असे असतानादेखील महापालिकेत संपूर्ण सत्ता मिळविता येईल, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती नाही.

ही बाब नेते, पदाधिकाऱ्यांनादेखील अवगत आहे. त्यामुळे किमान किंगमेकर होण्याच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार आहेत. किंगमेकर होण्यासाठी किमान वीसपर्यंत नगरसेवकांचा आकडा गाठणे गरजेचे आहे;

ncp latest marathi political news
NMC Election : आरक्षणातून अनेक दिग्गजांची दांडी

परंतु त्याबद्दलदेखील नेत्यांमध्येच साशंकता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नगरसेवकांचा आकडा कमी करताना सध्या पंधरापर्यंत येऊन थांबला आहे. महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे नगरसेवक आहेत त्या जागांव्यतिरिक्त अन्य जागा पदरात पाडून घेण्याचे नियोजन आहे.

जेथे पक्षाची ताकद कमी आहे, तेथे अपक्षांना बळ देणे, अन्य पक्षातील नाराजांना उमेदवारी देऊन निवडून आणणे अशा क्लृप्त्या वापरून पंधरा ते वीस नगरसेवकांपर्यंत संख्या पोचविण्याची धडपड सुरू आहे.

"आरक्षणामुळे अनेक प्रभागांमधील गणिते बदलली आहेत. त्याचा विचार करून आता नव्याने नियोजन करावे लागणार आहे. बूथ कमिट्या सक्षम करण्यात आल्या आहेत. पुढील आठ-दहा दिवसांत निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीनिशी पक्ष उतरेल. बदलत्या राजकीय परिस्थितीत अधिक जागांवर नगरसेवक निवडून येतील." -रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ncp latest marathi political news
Ashadhi Wari : निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्रंबकेश्वर येथे परतली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.