Nashik : जिल्हा बँकेने ओलांडला 400 कोटींचा टप्पा

NDCC Bank latest marathi news
NDCC Bank latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : खरीप हंगामामध्ये जिल्हा बँकने (NDCC Bank) पीककर्ज वाटपात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बँकेने आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार ४१३ सभासदांना ४०१ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकेने ७०५, तर ग्रामीण बँकेने ५९७ कोटी पीककर्जाचे वाटप केले आहे. (NDCC Bank crossed 400 crore mark Nashik Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे दोन हजार ९४७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत एक हजार २३७ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यात ४२ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे.

या पीककर्जाचा जिल्ह्यातील ७५ हजार ८५८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. ग्रामीण बँकेची सभासद संख्या कमी असल्याने बँकेची कर्जवाटपाची टक्केवारी अधिक आहे. खासगी बँकेकडून आतापर्यंत सर्वाधिक कमी पीक कर्जाचे वाटप सभासद यांना करण्यात आले आहे.आतापर्यंतचे पीककर्जवाटप

NDCC Bank latest marathi news
मालेगाव जिल्हानिर्मितीवरून शिंदे गटात मतभेद; आमदार कांदे यांचे कानावर हात

बँक उद्दिष्ट (कोटीत) कर्जवाटप (कोटीत) सभासद टक्केवारी

राष्ट्रीय बँक १ हजार ९२० ७०५ २६६९० ७६.७१

ग्रामीण बँक ८०५ ५९७ ४७२ ७४.१९

जिल्हा बँक ५५१ ४०१ ४४४१३ ७२.८४

खासगी बँक ४६६ १२४ ४२८३ २६.६५

NDCC Bank latest marathi news
Nashik : मोलमजुरी करणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.