NDCC Bank News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ५५ हजार थकबाकीदारांमुळे ११ लाख बॅंकेचे ठेवीदार अडचणीत सापडलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत आठवड्यात थकीत कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश दिले. (NDCC Bank News District back staff aggressive for overdue recovery Apologies to CM Shinde nashik news)
त्यामुळे ठेवीदारांसह, सभासद संतप्त झाले आहेत. यातच बॅंकेचे कर्मचारी देखील आक्रमक झाले असून, नाशिक जिल्हा को ऑप बँक एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बॅंकेची आर्थिक बाजू मांडली. तसेच मोठे व ऐपतदार थकबाकीदारांकडे वसुली कार्यवाही सुरु ठेवण्याबाबत सूचना कराव्यात, असे साकडे घातले.
जिल्हा बँकेच्या जिल्हा को आप बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष रतन जाधव, सरचिटणीस प्रदीप (रमेश) शेवाळे, उपाध्यक्ष मिलिंद देवकुटे, मिलिंद पगारे, हिरामण नलावडे यांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन, संघटनेच्यावतीने निवेदन दिले.
आशिया खंडात नावलौकिक असलेली नाशिक जिल्हा बॅक आर्थिक संकटात सापडली आहे. जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांकडून वसुलीची कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यातील ५५ हजार ७३७ थकबाकीदार सभासदांकडे २३६५ कोटीचे (मुद्दल +व्याज ) शेती कर्ज थकविल्यामुळे यातील रक्कम १० लाखावरील थकबाकीदार सभासदांकडे बँकेच्या एकूण थकबाकीपैकी ४३ टक्के रक्कम आहे.
ही रक्कम थकविल्यामुळे बँकेच्या ११ लाख ठेवीदारांना आजारपणा करिता, मुला-मुलींच्या लग्नाकरिता, शिक्षणासाठी व गरज असतानाही बँकेकडून रक्कम देता येत नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
ठेवीदारांच्या ठेवी परत करणे ही मोठी व महत्त्वाची गरज आहे. बँक कर्मचारी गत ७/८ वर्षापासून वसुलीसाठी प्रयत्न करत आहे. बँकेची वसुली न झाल्यास तोटा व एनपीए कमी होणार नाही, या परिस्थितीत रिझर्व बँक कार्यवाही होऊ शकते.
या परिस्थितीत बँकेच्या ठेवीदारांचे व बँकेचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता वसुली कारवाई थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. हे निर्देश बँकेच्या ठेवीदारांना व बँकेला हानिकारक ठरतील. तरी, मोठे व ऐपतदार थकबाकीदारांकडे वसुली कार्यवाही सुरु ठेवावी, असे संघटनेकडून यावेळी सांगण्यात आले.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास करणार आंदोलन
थकीत वसुली थांबविण्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्देशावर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संतप्त झाले असून वसुलीची कार्यवाही थांबविल्यास थेट आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिले आहे. याउलट माजी संचालकांवरील वसुलीची कारवाई करून तत्काळ वसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत, संघटनेने मुख्यमंत्री यांना थेट पत्र दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.