NDCC Bank Recovery : जप्त वाहनांच्या लिलावाचा मार्ग खुला; न्यायालयाने स्थगिती उठवली

NDCC Bank Nashik
NDCC Bank Nashikesakal
Updated on

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुली करिता धडक मोहीम चालू केली आहे. जिल्हा बँकेची वाहन, ट्रॅक्टर कर्जाची मोठी थकबाकी असल्याने वसुली मोहिमेतंर्गत पेठ तालुक्यातील ३२ ट्रॅक्टर व इतर वाहने जप्त केली आहेत. त्यांची शासनमान्यता प्राप्त मूल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त करून मागील वर्षी १६ एप्रिल २०२२ ला जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता.

या लिलावाविरुद्ध काही थकबाकीदार सभासद उच्च न्यायालयात गेले. त्यावर तात्पुरती स्थगिती न्यायालयाने दिलेली होती. मात्र ही स्थगिती उठली असून या वाहनांचा लिलाव होणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी दिली. (NDCC Bank Recovery Way open for auction of impounded vehicles court lifted stay nashik news)

जिल्ह्यातील २०१५-१६ पूर्वीचे मोठे व प्रभावशाली तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास आदेश दिले आहे.

न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनवणींमध्ये बँकेने दिलेले कर्ज हे मालमत्तेकरीता दिलेले आहे. या मालमत्तेचे मूल्याकन दिवसेंदिवस कमी होत असून कर्जदाराचे व बँकेचेही नुकसान होत आहे. त्यामुळे जप्त केलेल्या ३२ ट्रॅक्टर वाहनाची दिलेली स्थगिती उठविण्यात यावी अशी विनंती केली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

NDCC Bank Nashik
Sakal Special : शहर विकास हाच क्रेडाईचा मुख्य केंद्रबिंदू; नाशिकच्या विकासाला अधिक संधी

त्यानुसार उच्च न्यायालयाने गतवर्षी १३ एप्रिल २०२२ ला दिलेली स्थगिती उठवून या जप्त केलेल्या ३२ ट्रॅक्टरचा लिलाव करण्यास ३० मार्च २०२३ च्या आदेशान्वये परवानगी दिलेली आहे.

जिल्हयातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या ३२ ट्रॅक्टरचा लिलाव होणार असल्याचे बँकेकडून कळविण्यात आले आहे.

NDCC Bank Nashik
BJP News : भाजप शहराध्यक्षाची 15 एप्रिलपर्यंत होणार घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.