NDVS Bank Election : व्यापारी बॅंक निवडणुकीत सहकार पॅनलची सत्ता! समर्थकांचा जल्लोष

Newly elected Board of Directors of Nashik Road Devalali Traders Cooperative Bank celebrating on Monday after the co-operative panel regained power in the election of the Board of Directors.
Newly elected Board of Directors of Nashik Road Devalali Traders Cooperative Bank celebrating on Monday after the co-operative panel regained power in the election of the Board of Directors.esakal
Updated on

NDVS Bank Election : नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक महिला गटाच्या दोन जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १२) सकाळी मतमोजणीस सुरवात झाली.

३५ टेबलवर ही मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून सहकार पॅनलच्या कमल आढाव, रंजना बोराडे या आघाडीवर होत्या. चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली.

यात कमल दिनकर आढाव यांना सहा ६७८ मते, रंजना प्रकाश बोराडे यांना सात हजार ०६३ मते तर पराभूत उमेदवार संगीता हेमंत गायकवाड यांना तीन हजार ०३६ मते मिळाली. याआधीच सहकार पॅनलचे १९ संचालक बिनविरोध निवडून आले होते. (NDVS Bank Election power of cooperative panel in commercial bank election nashik news)

विरोधी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सहकार खाते भ्रष्टाचाराने बरबटल्याचा व सताधाऱ्यांना मॅनेज झाल्याचा आरोप केला. त्यांच्या ४६ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सत्तारूढ सहकार पॅनलच्या १९ जागा बिनविरोध निवडून आल्या.

रंजना बोराडे विजय झाल्यानंतर त्यांच्या पतीचे कोरोनामध्ये निधन झाले आहे, त्यांना पतीची आठवण झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. मुलगा राहुल आणि इतर संचालकांनी त्यांचे सांत्वन केले.

कार्यकर्त्याचा जल्लोष

कमल आढाव व रंजना बोराडे निवडून आल्याचे समजताच समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. पॅनलचे नेते निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड जल्लोषात सहभागी झाले. सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

नवनिर्वाचित संचालक मंडळ असे

सर्वसाधारण गट : निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, वसंत अरिंगळे, जगन आगळे, सुनील आडके, मनोहर कोरडे, गणेश खर्जुल, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, अशोक चोरडिया, अरुण जाधव, रमेश धोंगडे, योगेश नागरे, विलास पेखळे, डॉ. प्रशांत भुतडा. इतर मागास वर्ग गट : सुधाकर जाधव. विमुक्त जाती भटक्या जमाती : प्रकाश घुगे. अनुसूचित जमाती गट : रामदास सदाफुले. यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना आज संचालक घोषित करून प्रमाणपत्र देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Newly elected Board of Directors of Nashik Road Devalali Traders Cooperative Bank celebrating on Monday after the co-operative panel regained power in the election of the Board of Directors.
Nashik News: विद्युत वाहिनीचे मिनी पिलर उघडे! महावितरणाचा भोंगळ कारभार

"विरोधकांनी पॅनलची निर्मिती करून, प्रचाराचा धुरळा उडवत आरोप प्रत्यारोप केले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले नव्हते. विरोधकांनी एक महिला उमेदवार ठेवून निवडणूक लादली. सभासदांनी त्यांना नाकारले. बँकेचा इतिहास सभासदांना माहिती आहे. जागरूक सभासदांनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून दिले. यापुढे बँकेच्या विकासासाठी झटत राहणार असून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवून दाखवू."

-दत्ता गायकवाड, नवनिर्वाचित संचालक

"विरोधकांनी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनेक आरोप केले. मात्र सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आमच्या उमेदवारांना मिळालेले मताधिक्य हे आमच्या कामकाजाची पावती आहे. सभासदांचा आमच्यावर विश्वास असून ते आमच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे यानिमित्त दिसून येते. यापुढेही बँकेच्या प्रगतीसाठी कायम तत्पर असणार आहोत."

-निवृत्ती अरिंगळे, नवनिर्वाचित संचालक

Newly elected Board of Directors of Nashik Road Devalali Traders Cooperative Bank celebrating on Monday after the co-operative panel regained power in the election of the Board of Directors.
Inspirational News : पिंपळगावच्या सुषमाताई बनल्या महिला सक्षमीकरणाच्या दूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.