मेशी (जि.नाशिक) : मालेगावकडून सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या या रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे असल्याने येथे नेहमी अपघात होतात. गेल्या वर्षी येथे बस व रिक्षा विहिरीत पडून २८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आणि त्यात आता आणखी एक दुर्घटना घडली आहे.
एक वर्ष उलटूनही याबाबत कुठलीही कार्यवाही नाही
देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट येथे उसाने भरलेला ट्रक उलटला. चाळीसगाव तालुक्यातील ककाणी येथून उसाने भरलेला ट्रक (एमएच ०९ एल २०४१) वसाका कारखान्याच्या दिशेने जात होता. मेशी धोबी घाटाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. रस्त्याचे २०१८ ला डांबरीकरण होऊनही कुठल्याही वळणावर दिशादर्शक फलक लावले गेले नाहीत. बस व रिक्षा अपघातानंतर रस्त्याचे काम केले जाईल, असे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. परंतु एक वर्ष उलटूनही याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.