Nashik News: राईस मिलसाठी क्लस्टर वेअर हाउसची गरज; घोटी येथील उद्योजकांचे मत

Gotu Kumat & Sanjay Chordia
Gotu Kumat & Sanjay Chordiaesakal
Updated on

घोटी : तांदळाचे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुक्यातील तांदळाला क्लस्टर वेअर हाउसची गरज आहे, असे शहरातील राइस मिल उद्योजकांनी सांगितले.

गुणवत्तापूर्ण तांदुळ निर्मितीसाठी आधुनिकीकरणाबरोबरच हवामानाचा योग्य अभ्यास महत्त्वाचा ठरतो. यांत्रिकीकरण व पारंपरिकतेच्या दुहेरी अनुभवातून उत्कुष्ट तांदूळ निर्माण करण्याचा हातखंडा येथील उद्योगाचा आहे. (Need for cluster ware house for rice mill Opinion of entrepreneurs from Ghoti Nashik News)

राज्याच्या विविध भागांत वातावरणातील बदल, परंपरेनुसार अथवा आवडीनिवडीनुसार वेगवेगळ्या तांदूळाची निर्मिती केली जाते. प्रामुख्याने खाण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तांदळास बाजारपेठेत मोठी मागणीआहे.

येथील तांदूळ चवदार असल्याने विविध शहरांतील ग्राहकांना त्याची भुरळ पडल्यावाचून राहत नाही. असे असले तरी या उद्योगास भरारी येण्यासाठी सरकारने जागतिक बाजारपेठेत स्थान देणे गरजेचे आहे.

उद्योग वाढीस लागून शेतकरी, कामगार व उद्योजकांचा फायदा होईल, असे मत येथील राईस मिल उद्योजकांनी व्यक्त केले.

Gotu Kumat & Sanjay Chordia
Nashik News: आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारणीसाठीचा निधी परतीच्या मार्गावर

चार वाणांना जादा मागणी

ग्राहकांची अधिक मागणी इंद्रायणी, सोनम, गरी कोळपी व १००८ या वाणांच्या तांदूळाला आहे. प्रत्येकी राईस मिल तासी ३ टन मालाची निर्मिती करते.

दिवसाला ५० मिलमधून ६०० टन तांदळाची निर्मिती होते. विजेचा तुटवडा झाल्यास कमी अधिक प्रमाण होते. यातून कोट्यवधींची उलाढाल होते.

"आयात व निर्यातीत मुख्य अडचण असल्याने जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा कच्चा माल येथील बाजार समिती आवारात आणला व जाहीर लिलाव झाल्यास यात स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्याचा फायदा होईल व बाजारपेठ टिकून राहील."-गोटू कुमट, राईस मिल उद्योजक, घोटी

"सिडकोच्या धर्तीवर राईस मिल उद्योगासाठी विशेष जागेची तरतूद करण्यात यावी, क्लस्टर वेअर हाउसची सुविधा दिली पाहिजे. स्वतंत्र वीज वितरण फिडरची व्यवस्था केल्यास विजेचा तुटवडा भासणार नाही."- संजय चोरडिया, राईस मिल उद्योजक, घोटी

Gotu Kumat & Sanjay Chordia
Nashik News: केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेत दिरंगाई! जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे गुरुवारी उपोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.