वीस लाख लोकसंख्येसाठी अवघे बारा मानसोपचारतज्ज्ञ

Psychiatrist
Psychiatristesakal
Updated on

नाशिक : लॉकडाऊन (lockdown) व शाळा बंद असल्याने चार भिंतींच्या आत कोंडलेल्या लहान मुले व विशेषतः: महिला, ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आरोग्याच्या (Mental health) समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. त्यांना आता समुपदेशनाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी भविष्यात मानसोपचारतज्ज्ञांची (Psychiatrist) मोठी गरज शहरात भासणार असल्याचे मत सर्वेक्षणाअंती तज्ञांनी व्यक्त केले आहे. (need-for-a-large-number-of-psychiatrists-in-future)

वीस लाख लोकसंख्येसाठी अवघे बारा मानसोपचार तज्ञ

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सध्या वीस लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरासाठी अवघे बारा मानसोपचार तज्ज्ञ आहेत. कोविड नंतरच्या परिस्थितीनंतर बिघडलेली मानसिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची ही संख्या स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमधील आरोग्य व वैद्यकीय सेवेचे धिंडवडे काढणारी ठरत आहे.लॉकडाउनमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना घराबाहेर पडता येत नाहीत, र शैक्षणिक संस्था वर्षभरापासून बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना अन्य शैक्षणिक साधने बंद आहेत. कायम भ्रमणध्वनी हाताळल्याने मानसिकता बिघडली आहे. डोळे मिचमिचणे, आत्मविश्‍वास खालावणे, झोपेत दचकून उठणे, एकच शारीरीक क्रिया वांरवार करणे, स्मृतीभंश होणे, मित्र गमावल्याने जगाच्या व्यावहारिक ज्ञानापासून दुरावणे, नैराश्‍य येणे, डोळे- डोके- कान या अवयवांचे आजार उद्भवणे, चिडचिड होणे, अपचन, एकमेकांवर रागावणे या प्रकारच्या शेकडो मानसिक आजार उद्‌भवत आहे. या उपचारांसाठी कुठली शस्रक्रिया नाही. समुपदेशन हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी मानसशास्रज्ञांची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत मोठ्या गंभीर परिस्थितीमध्येच मानसशास्रज्ञांकडे धाव घेतली जात होती. कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये मानसिक समस्यांमध्ये वाढ होत असल्याने मानसोपचार तज्ज्ञांची आवशक्यता आहे. शहरात सध्या बारा मानसोपचार तज्ञ कार्यरत आहे. ग्रामीण भागामध्ये तर मानसिक आजार हा प्रकारच तेथील नागरिकांना माहीत नाही, अशा परिस्थितीमध्ये येत्या काळात मोठ्या प्रमाणात मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासणार असून त्यासाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.

Psychiatrist
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

एकाग्रता हरविलेले १७ टक्के

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच ४० वयोगटापुढील नागरिकांमध्ये १७.२३ टक्के असे आहेत, की त्यांची एकाग्रता हरविली असून चंचलतेचे प्रमाण झपाट्याने घटल्याचे निरीक्षण ह्यूमन मेन्टोलॉजी या संस्थने नोंदविले आहे. त्यांचा आत्मविश्‍वास विकसित करणे ही काळाची गरज असून त्यासाठी मानसोपचार तज्ञांची आवश्यकता भासणार आहे. नाशिक शहरामध्ये २८ मुले असे आहेत, की ती संवेदनहीन झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अशा मुलांची नोंद झाली आहे. भविष्यात ही संख्या वाढणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाला तयारी करणे आवश्‍यक आहे.

मानसिक दोष आढळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णांची मानसिकता बळकट करण्यासाठी, आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची आवश्‍यकता भासणार आहे. जिल्हा मानसिक आरोग्य संघटनेअंतर्गत औद्योगिक कारखाने, शासकीय व खासगी आस्थापने, शैक्षणिक संस्थांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करावी लागणार आहे. - डॉ. वृषिनित सौदागर, मानसोपचार तज्ञ.

Psychiatrist
नाशिकमध्ये आढळली तिसरी प्राचीन बुद्ध लेणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.