असंघटितांपर्यत शासकीय मदत पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

Dr Neelam Gorhe
Dr Neelam GorheSakal
Updated on

नाशिक : कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नसलेले रिक्षाचालक, असंघटित मजुरांना शासकीय मदत पोहोचण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. ही मदत देताना कागदपत्रांअभावी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, पूर्ततेसाठी प्रसंगी शिबिर घ्या असे आवाहन करीत कोरोना मुक्तीसाठीचा नाशिकचा पथदर्शी प्रकल्प राज्यभर पोचवा असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कामगार उपायुक्त विकास माळी, महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुणीही वंचित राहू नये

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,‘ कोरोना काळात मुंबईतील धारावी मॉडेल राज्यभर चर्चेत राहिले. नाशिकला त्याच धर्तीवर कोरोना नियंत्रणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असल्यास त्याविषयी माहिती द्यावी. कोरोनामुळे रोजगार नसलेल्या रिक्षाचालकांसह असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी सरकारने मदत योजना राबविली. बांधकाम मजूर आणि घरकाम मजुरांची नोंदणी करावी. कागदपत्रांअभावी असंघटितांची गैरसोय होऊ नये. अनाथ मुलांसाठी जिल्हा टास्क फोर्सच्या माध्यमातून पारदर्शक व सूक्ष्म नियोजन करताना बांधकाम मजूर, रोहयोच्या मजुरांची नामनिर्देशित अधिकाऱ्यांमार्फतच नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Dr Neelam Gorhe
श्रावणातही 'देऊळ बंद'; हिंदुत्ववादी संघटना, देवस्थानांचा आक्रमक पवित्रा

नाशिकचा पुढाकार पथदर्शी

डॉ. गोऱ्हे यांनी नाशिकचा कोरोनामुक्त गावाचा पुढाकार पथदर्शी असल्याचे सांगितले. बैठकीत, मोखनळ (दिंडोरी), पळसे (नाशिक), पिंपळगाव बसवंत (निफाड), घोटी (इगतपुरी), नांदुरी (कळवण), रावळगाव (मालेगाव), भुताणे (चांदवड), तळाडे ( येवला), वडांगळी (सिन्नर) सह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेट चंद्राची या कोरोनामुक्त गावातील सरपंचांनी अनुभव कथन केले.

नाशिक १८ व्या स्थानी

जिल्हाधिकारी मांढरे यांनी नाशिक राज्यात १८ व्या स्थानी असल्याचे सांगत कोरोना काळातील विविध उपाययोजनाची माहीती दिली. तिसऱ्या लाटेची तयारी पूर्णत्वास आली आहे. ७० लाख लोकसंख्येपैकी १६ लाख नागरिकांना लस दिल्याचे स्पष्ट केले. राज्याचा संसर्गदर ३.८३ तर जिल्ह्याचा १.८५ टक्के असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त जाधव यांनी तिसऱ्या लाटेसाठी ५०० बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार असल्याचे सांगितले.

Dr Neelam Gorhe
नाशिक मनपा राबविणार स्मार्ट स्कूल योजना

त्यासाठी शिबिर घ्यावेत

जिल्ह्यात २४ हजार रिक्षाचालक असून त्यापैकी १९ हजार चालक मदतीसाठी पात्र असून जेमतेम दहा हजार चालकांना मदत मिळाली. आधार लिंक नाही, परवाना नूतनीकरण नाही. लिंक होत नाही आदी कारणामुळे पन्नास टक्के राहिलेल्या चालकांना लाभ देण्यासाठी शिबिर घेण्याचे निर्देश दिले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना रिक्षा परवाने देण्याच्या धोरणाचा आढावा घेत परवाने मिळवून द्यावेत अशा सूचनाही श्रीमती गोऱ्हे यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()