टोइंग करताना देखभालीकडे दुर्लक्ष; पोलिसांची बघ्याची भूमिका

towing Van
towing Vanesakal
Updated on

नाशिक : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व नो- पार्किंगमधील वाहनांची शहर वाहतूक पोलिस शाखेकडून टोइंग करण्यात येते. मात्र, ही वाहने उचलताना वा टोइंग करताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणे वाहनांची हाताळणी केली जाते. त्यामुळे लाखो रुपयांच्या या वाहनांना स्क्रॅचेस्‌सह अनेक प्रकारचे नुकसान होते.

त्यासंदर्भात वाहनचालकांकडून जाब विचारला गेल्यास कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केली जाते, तर अशावेळी वाहतूक पोलिसही बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Neglect of maintenance while towing vehicles Nashik Latest Marathi News)

शहरातील मुख्य रस्ते अन् बाजारपेठांमध्ये ऐन सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीला प्रामुख्याने बेशिस्त पार्क केलेली वाहने, नो- पार्किंगमधील वाहनांमुळे अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. शहर वाहतूक शाखेकडून नो-पार्किंगमधील वाहने टोइंग केली जातात.

मात्र, ते करीत असताना दुचाकींना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाते. बेजबाबदार टोइंगमुळे वाहनधारकांसमोर वाहनांच्या नुकसानीबाबत गंभीर प्रश्‍न राहिला आहे. नो- पार्किंगमधील दुचाकी वाहनांची टोईंग वाहनात उचलून टाकतात. त्या वेळी टोइंग कर्मचारी दुचाकी रस्त्यावरून ओढून टेम्पोत ठेवतात. टेम्पोत ठेवताना वाहनांना स्क्रॅचेस्‌ पडतात. अनेकदा दुचाकीच्या ॲक्सेसरीज, साइड लाइट, साइड ग्लास तुटतात.

टेम्पोच्या फाळक्यावरही दुचाकी ठेवून त्यावर ते कर्मचारी बसतात. सदर प्रकार वाहतूक पोलिसांच्या समोर होत असतानाही सोईस्कररीत्या डोळेझाक केली जाते. वाहनधारक जेव्हा वाहतूक शाखेत वाहन घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांना वाहनाचे झालेले नुकसान दिसते. याबाबत जाब विचारल्यास टोइंग कर्मचाऱ्यांकडून उलटसुलट उत्तरे देत उलट दमदाटी केली जाते. यासंदर्भात वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली असता तेही जबाबदारी टाळतात. मात्र यातून वाहनधारकाला दंड भरूनही वाहनाच्या नुकसानीमुळे आर्थिक झळ सोसावी लागते आहे.

towing Van
Admission 2022- 23 : हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसीच्या Diploma प्रवेशाला मुदतवाढ

दुजाभाव कशासाठी?

नो- पार्किंगमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने असताना टोइंग कर्मचाऱ्यांकडून मात्र फक्त दुचाकी उचलून नेल्या जातात. स्मार्ट रोड, एमजी रोड, रविवार कारंजा या परिसरात नो- पार्किंगमधील चारचाकी वाहनांना वाहतूक शाखेकडून जणू अभयच मिळाले आहे.

त्यामुळे संपूर्ण स्मार्ट रोडवर नो-पार्किंगमध्ये चारचाकी वाहने सर्रास पार्क केली जातात. मात्र, या ठिकाणी दुचाकी असेल तर तत्काळ उचलून नेली जाते. त्यामुळे असा दुजाभाव कशासाठी, असा संतप्त सवाल दुचाकी वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

towing Van
Ganeshotsav 2022 : श्रीराम जन्मभूमी प्रतिकृतीने इंदिरानगर परिसर श्रीराममय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()