National Youth Festival: साहसी खेळांची युवा महोत्‍सवात उपेक्षा; सहभागींपर्यंत माहिती न पोहोचल्‍याने मर्यादित उपक्रम

उत्‍साहात पार पडणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्‍सवात साहसी खेळांची उपेक्षा बघायला मिळाली.
national youth festival
national youth festivalesakal
Updated on

नाशिक : उत्‍साहात पार पडणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्‍सवात साहसी खेळांची उपेक्षा बघायला मिळाली. सहभागींचा उत्‍साह वाढविण्यासाठी विविध ठिकाणी साहसी खेळांचे आयोजन केलेले असताना त्‍याविषयीची माहिती सहभागींपर्यंत योग्यरीत्या पोहोचलेलीच नसल्‍याचे समोर आले आहे.

त्‍यामुळे मर्यादित स्वरूपात उपक्रम राबविण्याचे सोपस्‍कार पार पाडण्यात आले आहेत. (Neglect of national Youth Festival of Adventure Sports Activities limited by lack of information reaching participants nashik)

उपक्रमाच्‍या नियोजनानुसार साहसी खेळांचे आयोजन हनुमान नगर यासह अंजनेरी, पांडवलेणी, ठक्‍कर डोम, गंगापूर रोडवरील बोट क्‍लब या ठिकाणी करण्याचे निश्‍चित केले होते.

युवा महोत्‍सवात विविध स्‍पर्धा होत असल्‍या तरी साहसी खेळ मात्र मनोरंजनासाठी पर्याय म्‍हणून उपलब्‍ध केले होते. परंतु सहभागी युवा कलावंतांपर्यंत यासंदर्भात माहितीच पोहोचलेली नाही. त्‍यामुळे साहसी क्रीडा प्रकारांना प्रतिसादच मिळालेला नाही.

हनुमान नगर येथे इंडियन माऊटनिंग फाउंडेशनच्‍या माध्यमातून आर्टिफिशियल वॉल क्‍लायबिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत अवघड भिंतीवरील चढाईच्‍या कौशल्‍याचे प्रशिक्षण देण्याच्‍या उद्देशाने माहितीपट दाखविले.

यासोबत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना महोत्‍सवस्‍थळी उभारलेल्या कृत्रिम भिंतीवर चढण्याची संधी उपलब्‍ध होती. त्‍यातही स्‍थानिक काही समूहांनी समाज माध्यमांवर प्रशिक्षणाविषयी संदेश व्‍हायरल केल्‍याने महोत्‍सवात सहभागी युवकांना मर्यादित स्वरूपात संधी उपलब्‍ध राहिली.

national youth festival
Nashik First News : राज्यातील दीड हजार वाहतूक पोलिसांना नाशिक फर्स्टच्या प्रशिक्षणाचा लाभ

स्‍थानिकांनीच प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदविला. एकंदरीत महोत्‍सवात साहसी क्रीडा प्रकार आयोजनाचा प्रयत्‍न अयशस्‍वी झाल्‍याचे बोलले जाते आहे.

पायाभूत सुविधा विकासाची संधी हुकली

महोत्‍सवानिमित्त साहसी क्रीडा प्रकारांविषयी पायाभूत सुविधा विकसित करण्याची चांगली संधी होती.

यामध्ये उत्तम दर्जाची आर्टिफिशियल वॉल उभारली असती तर त्‍याचा भविष्यातही कायमस्वरूपी उपयोग झाला असता. मात्र तात्‍पुरती व्‍यवस्‍था करण्यास प्राधान्‍य दिल्‍याने संधी हुकल्‍याची भावना काहींकडून व्‍यक्‍त करण्यात आली.

national youth festival
Nashik: मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियान प्रभावीपणे राबवा; दिलीप बोरसे, चित्रा देवरे यांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.