Nashik: ड्यूटी त्र्यंबकेश्वरची ओढ मात्र नाशिकची! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष

Teacher
Teacheresakal
Updated on

Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावे वाडे-पाडे येथील शाळांवर शिक्षक कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे सातशे अधिक नोकरदार कर्तव्य बजावतात. मात्र त्यातील जवळपास सगळीच मंडळी राहायला मात्र नाशिकला असल्याने ड्यूटीवर येण्यासाठी आणि जातांना ड्युटीपेक्षा निवासाची ओढ असते.

परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा मोठाच परिणाम होत असल्याचा संवाद पालकवर्गात होऊ लागला आहे. (Neglect of teachers in Trimbakeshwar taluka parents worried Nashik)

शहरासह विविध भागातून नियुक्तीच्या शाळेवर दररोज ये- जा करतांना अनेकांनी त्यांच्या स्व:ताच्या येण्या जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या अशा स्व:ताच वेळा करून घेतल्या आहेत. शाळेच्या वेळापेक्षा स्व:ताच्या सोयीच्या वेळा पाळण्यावर अनेकांचा भर असतो.

शासकीय नियमाप्रमाणे शाळेवर ड्युटीला सकाळी दहाला तर सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर घरी परतीला निघाले पाहिजे, असे अपेक्षित असले तरी तसे होत नाही, अशी एल्गार कष्टकरी संघटनेची तक्रार आहे.

एल्गार संघटनेतर्फे भगवान मधे यांच्या तक्रारीनुसार बहुतांश शिक्षक सोयीनुसार स्वयंघोषित नियमाप्रमाणे सकाळी शाळेवर साडेअकरा ते पावणेबाराला केव्हाही येतात. घरी जातांना मात्र, दुपारी साडेचारला घरचा रस्ता धरतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher
Jal Jeevan Mission: अद्याप 14 योजनांवर निर्णयाची प्रतिक्षा! ‘जलजीवन’च्या वनविभागाकडील प्रलंबीत 25 योजना मार्गी

यामुळे शिक्षकांचे शाळेवर दुर्लक्ष होते. त्र्यंबकेश्वर आदिवासी बहुल तालुका असून येथील शिक्षकांना पेसा अंतर्गत विशेष वेतन सवलती मिळतात. पण आदिवासी ग्रामीण भागात शिक्षकांच्या या मनमानीमुळे जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकांच्या उपस्थितीची गंभीरपणे तपासणीची गरज आहे.

कळमुस्ते ग्रामपंचायत आणि हर्षवाडी सह अनेक जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. नाशिकला जाऊन येऊन करतात.

Teacher
Nashik ZP News: 2 दिवस शिल्लक असताना जि. प. चा लागेना ताळमेळ! आगामी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.