Nashik News: चेतनानगरची गुड्डी झाली अमेरिकेची सून! सैन्यातील कॅप्टन मिलरशी झाला विवाह

Family including bride Neha and groom Matthew Miller
Family including bride Neha and groom Matthew Milleresakal
Updated on

Nashik News: चेतना नगर येथील रहिवासी आणि अंबड औद्योगिक वसाहती मधील सिद्धी इक्विपमेंट्स कंपनीचे संचालक देवेंद्र आणि शुभांगी विभुते यांची कन्या नेहा (गुडडी) आणि अमेरिकेच्या सैन्यात कॅप्टन म्हणून नोकरीला असणारे मॅथ्यू मिलर यांचा विवाह हॉटेल रेडिसन ब्लू येथे हिंदू रिवाजाप्रमाणे पार पडला. (Neha and Matthew Miller Captain in US Army got married as Hindu rituals nashik news)

अमेरिकेतून वऱ्हाडी म्हणून आलेल्या मिलर कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी विवाहासाठी केलेल्या पारंपारिक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2014 ला नेहाला अमेरिकेत लॉस एंजलीस येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये संगणक शाखेत एम एस या उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच तिने 2017 ला अमेरिकेतच जॉर्जिया येथील दि रेड क्लिफ ग्रुप मध्ये मोठ्या पदावर नोकरीला सुरवात केली. याच वेळी येथील एमबीए पर्यंतचे शिक्षण झालेले आणि अमेरिकन सैन्यात कॅप्टन असलेल्या मॅथ्यू मिलर या युवकाशी तिची हिंजे डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाली.

या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. एकमेकांच्या आवडी निवडी पसंत पडल्या. मोठ्या कंपनीत व्यवस्थापक असलेले मॅथ्यूचे वडील थॉमस आणि गृहिणी असलेली आई एमी मिलर यांना देखील नेहा भावली.

Family including bride Neha and groom Matthew Miller
Unique Wedding: लग्नातील अनोख्या आहेराने घडविले कृषिसंस्कृतीचे दर्शन! शेतकरी मोगल यांच्या उपक्रमाचे कौतुक

इकडे भारतात नेहाच्या आई-वडिलांना देखील ही सर्व मंडळी पसंत पडली आणि मुला आणि मुलीच्या आनंदासाठी दोघा कुटुंबांनी विवाहाल मान्यता दिली.

मात्र विवाह भारतात आणि हिंदू चालीरीतीप्रमाणे व्हावा ही विभुते कुटुंबीयांची इच्छा होती. ती मिलर कुटुंबीयांनी मान्य करत संपूर्ण मिलर कुटुंबीय दोन दिवसांपासून नाशिकला आले. नेहाचे काका आणि राणेनगर येथील सह्याद्री युवक मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश विभूते आणि मंडळाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्यासह सहकार्यांनी या विवाहाची तयारी करून घेतली.

विवाहातील हळद, मंगलाष्टके, सप्तपदी , कन्यादान आदि सर्व विधींमध्ये मिलर कुटुंबातील सदस्यांनी आनंदाने भाग घेतला. जवळचे नातेवाईक, मित्र आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह धुमधडाक्यात पार पडला.

Family including bride Neha and groom Matthew Miller
Namo Shettale Abhiyan: शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेततळे’ अभियान! राज्यात 7 हजार शेततळे उभारणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.