Nashik News: पिंपळगावमध्ये पसरतेय बँका, पतसंस्थाचे जाळे! बँका जाताहेत ग्राहकांच्या दारात

‘मिनी दुबई’ असे बिरूद लावल्या जाणाऱ्या पिंपळगाव शहराच्या ‘श्रीमंती’ची ओळख सातासमुद्रापार आहे.
Banking
Bankingesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : ‘मिनी दुबई’ असे बिरूद लावल्या जाणाऱ्या पिंपळगाव शहराच्या ‘श्रीमंती’ची ओळख सातासमुद्रापार आहे. निर्यातक्षम द्राक्षातून परकीय चलन, काद्यांची आशिया खंडात अव्वल बाजारपेठ, टोमॅटोची राजधानी यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक उलाढाल असणारे शहर, अशी ‘द्राक्षनगरी’च ख्याती आहे.

आर्थिक सुबत्ता लाभलेल्या या शहराची भुरळ राष्ट्रीयकृत, खासगी बँकांना पडली आहे. नाशिक शहराच्या तोडीस तोड बँका व पतसंस्थांनी आपली दुकाने थाटली आहेत.

जणू काही बँका, पतसंस्थांचे जाळेच पिंपळगाव शहरात विणले गेल्याचे दिसत आहे. अजूनही काही बँका पिंपळगांवमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. (network of banks and credit institutions spreading in Pimpalgaon Banks go to customers doorsteps Nashik News)

पिंपळगाव शहरात व्यापार, नोकरी, उद्योग व्यवसायामुळे नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. अकुशल कामगार येथे पाचशे ते सातशे रुपये रोज कमावतो. त्यातून व्यापार, उद्योगाची भरभराट अधोरेखित होते.

येथील मातीत निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्याचा गुणधर्म दडला आहे. कांदा, टोमॅटोची बाजारपेठेमुळे शहराचे अर्थकारण दररोज करोडो रुपयांभोवती फिरते. या अर्थचक्रावर गेल्या दहा वर्षांपासून बँकांची नजर खिळली आहे.

आर्थिक उलाढालीतून बँका, पतसंस्थांना व्यवसायाची संधी खुणावते आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राष्ट्रायीकृत बँका, काही खासगी बँका व पतसंस्था अवतरल्या आहेत. स्थानिक नेत्यांनी पतसंस्था उघडल्या आहेत.

बँका व पतसंस्थांकडून ग्राहकांना कर्ज व ठेवींवर आकर्षक व्याजदराचे फंडे वापरले जात आहेत. बँकिंग क्षेत्रात जोरदार स्पर्धा पिंपळगाव शहरात बघायला मिळत आहे.

Banking
Nashik News: स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी घरात वीजपुरवठा; अवघ्या 12 दिवसात उदिष्ट पूर्ण

त्यामुळे बॅंक अधिकारी व कर्मचारी ग्राहकांच्या दारात जाऊन ठेवी ठेवणे व कर्ज घेण्यासाठी गळ घालताना दिसत आहेत. काही बँका ग्राहकांना भ्रमणध्वनीवर कॉल करून कर्ज घेण्यासाठी पिच्छा पुरवीत आहेत.

शेतीमालाची आशिया खंडातील अव्वल बाजारपेठ असल्याने द्राक्ष, कांदा, टोमॅटोच्या माध्यमातून हंगामात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. त्यावेळी बँकांमधील अर्थकारण म्हणजे पैशांचा पाऊस पडावा, असे असते.

तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या पिंपळगाव शहरात शासकीय व खासगी नोकरदार मोठ्या प्रमाणात निवासास आहेत. त्यांची पगार खाते येथील बँकांमध्ये असल्याने उलाढालीत अधिकच भर पडते. खासगी फायनान्स कंपन्यांचाही शहरात शिरकाव झाला आहे.

चिंचखेड रस्त्यावरील बँक स्टीट, जुना महामार्गावर बसस्थानक ते बसवंत मार्केट, महामार्गावरील चिंचखेड चौफुली ते शहा पेट्रोलपंप, अशा मार्गांवर द्राक्षनगरीत बँका, पतसंस्थांचे जाळे विस्तारले आहे.

"शहरात बाजार समिती, कृषी निविष्ठासह विविध व्यवसायांची दालने, नोकरदार वर्गामुळे वार्षिक आर्थिक उलाढाल अब्जावधी रुपयांत जाते, म्हणून पिंपळगावचा उल्लेख ‘मिनी दुबई’ असा होतो. त्यामुळे बँकांचे जाळे विस्तारणे स्वाभाविक आहे. अजूनही काही बँकांचे आगमन होणार आहे. शहरातील वाढता व्यापार पाहता सर्वच आर्थिक संस्थांना व्यवसायाची संधी आहे."

-अशोक शाह, बँकिंग तज्ज्ञ

Banking
Nashik News: ट्रॅक्टरच्या धडकेने रेल्वे फाटक बंद! निफाड स्थानकाजवळ दीड तास वाहतुकीचा खोळंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.