नाशिक : दुसरी लाट (corona second wave) संपली असली, तरी नवीन डेल्टा प्लस (delta plus)विषाणूच्या रूपाने कोरोनाचे आव्हान कायम आहे. संभाव्य तिसरी लाट व नवीन डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता जास्त असल्याने नागरिकांनी स्वत: काळजी घेऊन कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केले. (new-challenge-of-corona-in-form-of-Delta-Plus-nashik-marathi-news)
विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी नियम पाळा
भुजबळ म्हणाले, की केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने काळजी घेण्याच्या सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आल्या. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी टाळावी, मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा. जेणेकरून डेल्टा प्लस या नव्याने येणाऱ्या विषाणूचा सामना करू शकतो. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कडक संचारबंदीच्या अंमलबजवणीसाठी पोलिस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करावी. जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकर सुरू करावेत. रुग्णालयात बेडची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा याकडे लक्ष देऊन नियोजन करावे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी म्युकरमायकोसिस आजाराच्या उपाययोजनांची माहिती दिली.
मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी (ता. २४) भुजबळ यांनी कोरोनापश्चात आजारांबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.