Nashik: नाशिक कॅम्पसमध्ये नवीन शिक्षणक्रम! पुणे विद्यापीठ व्‍यवस्‍थापन परिषद बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune Universityesakal
Updated on

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीच्‍या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ६) विविध प्रस्‍तावांवर चर्चा झाली.

यामध्ये नाशिक उपकेंद्र सक्षमीकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या माध्यमातून नवनवीन शिक्षणक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (New Course in Nashik Campus Discussion on various topics in Pune University Management Council meeting)

गुरुवारी (ता. ५) बैठकीत झालेल्‍या चर्चेत नाशिक उपकेंद्रांच्या वाढीव बांधकामासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यासह मनुष्यबळ भरती धोरण, उपपरिसर मंडळ नियुक्त्या जाहीर केली होती.

त्यामुळे शिवनाई (ता. दिंडोरी) येथे उभारण्यात येत असलेल्‍या उपकेंद्रांच्या इमारतीत वाढीव दहा हजार स्क्वेअर फूट बांधकामाचा एक मजला बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी दिली.

बैठकीत नाशिक कॅम्पसमध्ये पुढील वर्षी सुरू करण्यात येणाऱ्या बीबीए कोर्ससह डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, माहिती तंत्रज्ञान, संशोधन विषयातील काही शिक्षणक्रम सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली.

लवकरच कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर नाशिक दौरा करणार असून नाशिकच्या उद्योग क्षेत्राशी चर्चा करत रोजगाराभिमुख कोर्सेस सुरू करण्याबाबत पुढाकार घेणार असल्‍याचे निश्‍चित करण्यात आले.

Savitribai Phule Pune University
Nashik Ajit Pawar : शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या वाहनांसमोर टोमॅटो व कांदाफेक

बैठकीत नाशिक उपकेंद्रात आवश्यक मनुष्यबळ भरती विषयात सादर केलेला डॉ. राजेंद्र विखे- पाटील आणि सागर वैद्य यांच्या समितीचा प्रस्तावही संमत करण्यात आला. यानुसार विद्यापीठ कायद्यानुसार भविष्यात उपकेंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती विद्यापीठ निधीतून केली जाईल, असेही आश्वासित केले गेले.

सध्याच्या मनुष्यबळाचा आढावा घेऊन सुधारणाही केली जाणार आहे. सध्या मंजूर ११ पैकी केवळ पाच पदे भरली आहेत. उर्वरित रिक्त सहा पदे भरण्यासंदर्भात आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आल्‍याचेही श्री. वैद्य यांनी सांगितले आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांमुळे नाशिक, नगर उपकेंद्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात विद्यापीठाचे कॅम्पस सक्षम, विद्यार्थीभिमुख होईल.

अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाच्या नावलौकिकाला साजेसा कॅम्पस निर्माण करण्याचा प्रयत्न असेल असे श्री.वैद्य यांनी सांगितले.

Savitribai Phule Pune University
Navratri Festival 2023 : नवरंगांच्या साड्यांची वाढती क्रेझ! बंदेश पॅटर्नला पसंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.