Nashik News: पाथर्डीतील नववसाहतींना रस्त्यांची प्रतिक्षा! पावसाळ्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल

Neocolonies awaiting asphalt roads
Neocolonies awaiting asphalt roadsesakal
Updated on

Nashik News : प्रभाग ३१ मधील पाथर्डी गावाच्या बाजूने आणि एक्स्प्रेस इन हॉटेलच्या बाजूने मोठ्या नव्या वसाहती आकारास येत आहे. या ठिकाणी घरे घेतलेल्या नागरिकांना महापालिकेतर्फे आता रस्त्यांची अपेक्षा आहे. सध्या पावसाळ्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

पाथर्डी गावापासून गौळाणे गावाकडे जाताना एसएसके वर्ल्ड क्लब परिसरात असलेले सर्वे क्रमांक २०२, २०३ या भागात जवळपास सर्वच ठिकाणी मोठ्या इमारती आणि १० पासून ५० रो- हाऊसचे मोठे प्रकल्प आकारास आले असून, मोठ्या संख्येने नागरिकदेखील येथे राहण्यासाठी आले आहेत. (New settlers in Pathardi waiting for roads Citizens in dire straits due to monsoons Nashik News)

पाणी आणि ड्रेनेज लाईन येथे अस्तित्वात असल्या तरीदेखील पक्के रस्ते नसल्याने नागरिकांची आबाळ होत आहे. नोकरदार मंडळी विशेषतः महिलांना याचा मोठा त्रास होत आहे. नुकतेच हॉटेल एक्स्प्रेस इनच्या बाजूने पोद्दार स्कूलपर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरवात झाली.

या भागापर्यंत आलेल्या रस्त्यांचे जाळे आता पुढेपर्यंत जाण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. गौळाणे रस्त्यावरील सर्वे क्रमांक १९५ पर्यंत मोठ्या प्रमाणात घरांची बांधकामे सुरू झाली आहेत. नव्याने हॉटेल्सदेखील येथे उभे राहत आहेत.

त्यामुळे महापालिकेने या भागात लक्ष देण्याची मागणी आता जोर धरत आहे. गौळाणे, विल्होळी आणि एक्स्प्रेस इन कडून येणारे असे तीन अठरा मीटर रुंदीचे रस्ते जवळपास टेंडरच्या स्थितीत दोन वर्षांपूर्वी आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Neocolonies awaiting asphalt roads
Nashik: डॉ. कोतवाल दांपत्याने फुलविले नंदिनीचे जीवनगीत! मानसकन्येचा मुलीसारखा सांभाळ करीत दिला जीवनाला आकार

मात्र दरम्यानच्या काळात प्रशासकीय राजवट सुरू झाल्याने हे काम मागे पडले आहे. मात्र आता या भागात रस्त्यांची निकड लक्षात घेता प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

माजी नगरसेवक भगवान दोंदे आणि सुदाम डेमसे हे पाथर्डीचे भूमिपुत्र आहेत .गेल्या अनेक दिवसांपासून त्यासाठी ते पाठपुरावा करत असले तरीदेखील त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.

"या भागात रो- हाऊस घेतले आहे. मात्र, सध्या रस्त्यांची मोठी समस्या आहे. कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात मोठे हाल होत आहेत. येथील रस्त्यांची कामे लवकरात लवकर व्हावीत, अशी अपेक्षा आहे." - भाऊसाहेब पाटील, नागरिक

"शहराच्या इतर भागाच्या तुलनेने कमी किमतीमध्ये या ठिकाणी सदनिका आणि रो- हाऊस मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांची पसंती मिळत आहे. मात्र आता रस्त्यांची येथे नितांत गरज आहे. प्रशासनाने या भागासाठी आता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देत येथील मोठ्या रस्त्यांसह किमान ज्या ठिकाणी वस्ती झाली आहे, तेथील रस्ते पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे." - मदन डेमसे, बांधकाम व्यावसायिक

"येथील रस्त्यांचा आराखडा मंजूर आहे. आवश्यक तो पाठपुरावा सुरू आहे. आमदार सीमा हिरे यांच्याशीदेखील त्यांच्या विकासनिधीसाठी संपर्क साधला आहे. या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिवेशन काळात याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे."

- भगवान दोंदे, माजी नगरसेवक

Neocolonies awaiting asphalt roads
Nashik: अंजनेरी-ब्रह्मगिरी रोप-वे स्थलांतरणविषयी नाशिकच्या खासदारांना भेटा; संदीप भानोसेंना गडकरींची सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.