New Year 2023 : पोलिसांची करडी नजर, तरीही नविन वर्षाचा जल्लोष...

New Year Party
New Year Party Sakal
Updated on

नाशिक : कोरोनाच्या (Corona) निर्बंधमुक्त वातावरणात यंदा मावळत्या वर्षाला निरोप अन्‌ नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले. विशेषत: तरुणाईमध्ये उत्साह होता. त्यातच, पहाटेपर्यंत हॉटेलमधील पार्ट्यांना अन्‌ मद्यविक्रीलाही परवानगी मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण काहीसे दुणावले होते.

परंतु, यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर-जिल्ह्यात पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून कडक तपासणी केली जात होती.

New Year Party
New Year 2023 Resolution : नव्या वर्षात पार्टनरला करा 'हे' प्रॉमिस, नात्यात प्रेम अन् विश्वास वाढेल

थर्टी फर्स्ट आणि न्यू इअरचा जल्लोष करण्यासाठी यंदा शनिवार अन्‌ रविवार असे सुटीचे दिवस मिळाल्याने अनेकांनी शुक्रवारी रात्रीपासूनच जल्लोष सुरू केला. यानिमित्ताने नाशिकमध्ये पर्यटकांचीही रेलचेल दिसून आली.

शहरालगत असलेल्या वायनरींच्या ठिकाणी क्लब पार्ट्यांचे नियोजन केले होते. फार्महाउसही सज्ज होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच वाहनांची गर्दी आणि रात्री उशिरापर्यंत शहरातील वाइन शॉपवर ग्राहकांची गर्दी दिसून आली. मांसविक्रेत्यांकडेही खवय्यांची गर्दी वाढलेली होती.

New Year Party
New Year 2023 Predictions: नव्या वर्षाच्या प्रत्येक महिन्यात नवी घडामोड, कुठे राजकारण तापणार तर कुठे युद्ध

कडेकोट नाकाबंदी

नाशिक परिक्षेत्रात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत साडेचार हजार वाहने तपासण्यात आली. त्यापैकी २७७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहरात पोलिसांनी विशेष गस्त घातली. रात्री कोणत्याही आस्थापनांमध्ये गर्दी होणार नाही, याचे नियोजन करण्यात आले.

बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांसह बिट मार्शल, स्थानिक गुन्हे आणि ११२ डायल या पथकांची गस्त सुरू होती. रात्री आठपासून शहरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक चारचाकी आणि संशयित दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात आली. अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्याचा संशय येताच थेट जिल्हा रुग्णालयात नेत त्यांची वैद्यकीय तपासणी करून ‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’च्या कारवाई करण्याचे निर्देश होते.

New Year Party
Wedding Muhurat 2023 : लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! तब्बल आठ महिने असणार मुहूर्त!

शहरातील फौजफाटा

शहर पोलिस : चार पोलिस उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त, ३५ पोलिस निरीक्षक, १०० सहाय्यक व उपनिरीक्षकांसह दीड हजार पोलिस, २५० गृहरक्षक दलाचे जवान, यांसह पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेची पथके तैनात

दरम्यान, नववर्ष स्वागतासाठी विविध संस्‍था, समाजांच्‍या स्‍तरांवर सांस्‍कृतिक, संगीतमय कार्यक्रम झाले. त्याद्वारे रात्रभर मोठ्या प्रमाणात जल्‍लोष करण्यात आला. वर्षाचा शेवटचा दिवस शनिवारी, तर नवीन वर्षाचा पहिलाच दिवस रविवार असल्‍याने हा दुग्‍धशर्करा योगच ठरला.

वीकेंडमुळे आनंद द्विगुणीत करताना जोरदार बेत आखण्यात आले होते. तसेच, विविध मंदिरांत, धार्मिकस्थळी दर्शन घेत नवीन वर्षाचे स्‍वागत करण्याकडेही अनेकांचा कल दिसून आला. त्यामुळे नवश्‍या गणपती, सोमेश्‍वर, कपालेश्‍वर यांसह अन्‍य धार्मिक स्‍थळांवर गर्दी होती. रामतीर्थ परिसरातही रात्री दहानंतर भाविकांची वर्दळ वाढल्‍याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.