Nashik News : नववर्ष स्वागतावेळी कायदा पाळा

New Year Celebration
New Year Celebrationesakal
Updated on

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झालेले असताना, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

विनापरवाना मद्यपान न करता, तसेच कायद्याचे पालन करून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीणचे अधीक्षक शहाजी उमाप व नाशिक शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

दरम्यान, नाशिक शहर व जिल्ह्यात गुरुवारी (ता. २९) मध्यरात्रीपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी करून अवैध मद्यवाहतूक व अंमली पदार्थांविरोधी कारवाई केली जाणार आहे. (New year celebrate with rules and laws nashik police appeal to public nashik news)

New Year Celebration
SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात

नववर्षांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झालेले आहेत. तसेच नाशिक हे थंड हवेचे आणि धार्मिक स्थळ असल्याने पर्यटकांचीही गर्दी होते आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेकडूनही बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.

त्यातच, यंदा प्रथमच नववर्षाच्या पहाटे पाचपर्यंत हॉटेल्सला परवानगी आणि मद्यविक्रीलाही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची संपूर्ण रात्र नागरिकांना नववर्षाचा उत्सव साजरा करता येणार आहे. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, गुरुवारी मध्यरात्रीपासूनच शहर-जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

New Year Celebration
Sports News : वृषाली भोयेच्या धारधार आक्रमणाच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुली अंतिम फेरीत

जिल्ह्यात करडी नजर

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३०) व शनिवारी (ता. ३१) पोलिसांची करडी नजर राहणार असून, चोख नाकाबंदी केली जाणार आहे. जिल्ह्यातील फार्म हाऊससह विविध हॉटेल्समध्ये सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्टची बुकिंग झाले आहेत. या ठिकाणी गैरप्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क आहेत.

जिल्ह्यातील ४० पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. कोणीही दारू पिवून कोणीही गाडी चालवू नये, जे मद्यपी वाहने चालवतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय, अतिवेगाने वाहने चालविणाऱ्‍यांवर स्पीड गनमार्फत कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात पोलिसांची पथके नेमण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.

शहरात पथके तैनात

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरातही पोलीसांनी कडेकोट नियोजन केले आहे. शुक्रवारपासून रविवारपर्यंत चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्तांसह १२० पोलीस अधिकारी, दीड हजार पोलीस कर्मचारी, २५० होमगार्डस्‌ यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व दंगलविरोधी पथके तैनात राहणार आहेत.

याशिवाय, महिलांची १० पथकांमार्फत गस्त राहील. वाहतूक शाखेच्या पथकांमार्फत रॅशड्रायव्हिंग व मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच, हॉटेल्स, रिसॉर्टच्या ठिकाणी आयोजित पार्ट्यां विनापरवाने असतील तर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. त्यासाठी हॉटेल्स चालकांनी तत्काळ परवानग्या घ्यावेत. तसेच मद्यपान करणाऱ्यांनीही परवाना घ्यावा असे आवाहन शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

New Year Celebration
Nashik News : कलगी-तुरा मधील ‘झिलक्या’ पात्र साकारणारे यशवंत बाबा; वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.