नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या ६४ चालकांवर शहर पोलिसांनी ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह अन्वये कारवाई केली. यात सर्वाधिक २२ चालक हे अंबड पोलीस ठाण्याच्या नाकाबंदीमध्ये सापडले.
शहर पोलिसांनी चोख नाकाबंदीचे नियोजन केल्याने यंदा ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या पूर्वीपेक्षा कमीच केसेस नोंदल्या गेल्या आहेत. (New Year Celebration 64 drunkards stuck in Drunk Drive in city Nashik news)
Vकोरोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर यंदा नववर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी तरुणाईमध्येही उत्साह होता. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. शहरभर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करतानाच चालकांच्या मद्यपानाचीही शहानिशा केली जात होती. याशिवाय, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्यांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. तर, मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या ६४ चालकांविरोधात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हअन्वये गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली.
यात सर्वाधिक मद्यपी चालक हे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले. पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये परिमंडळ एकमध्ये २६, तर परिमंडळ दोनमध्ये ३५ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तालयातील कारवाई :
* ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाई : ६४
* हॉटेल कारवाई : ४
* टवाळखोर कारवाई : ११६
* वाहनांवर कारवाई : १४५
* जमा वाहने : ३१
* दंड : ५६,२०० रुपये
* अवैध मद्य कारवाई : ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.